---Advertisement---
जळगाव जिल्हा रावेर

महत्त्वाची बातमी : महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवर प्रवेश बंदी, शेकडो प्रवासी व गाड्यांना मज्जाव

no entry on maharashtra madhya pradesh border
---Advertisement---

 

no entry on maharashtra madhya pradesh border

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मार्च २०२१ । महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक सुरु आहे. राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश सरकारने महाराष्ट्रातून मध्यप्रदेशात जाणाऱ्या प्रवाशांना व गाड्यांना सीमेवर अडवून नाका बंदी केली आहे. यामुळे प्रवेशांचे हाल झाले.

---Advertisement---

 

रावेर-बऱ्हाणपूर रोडवरील लोणी गावाजवळ जवळ सकाळपासून कोरोना ॲन्टिजेन तपासणी निगेटिव्ह असलेल्या प्रवाशांना जाण्यास परवानगी असल्याचे सांगत शेकडो प्रवासी व गाड्यांना मज्जाव करण्यात आल्याने काहीकाळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

कोरोनाच्या धर्तीवर अचानक घेण्यात आलेल्या निर्णयामुळे प्रवाशांना भयंकर त्रास सहन करावा लागला. सीमेवर अडवणूक पाहता काहींनी सीमा नाक्यावर गाड्या सोडून पायी चालत काही अंतरावर नातेवाईकांना सांगून मध्य प्रदेशातील गाड्या बोलावल्या व आपले प्रवासाचे ठिकाण गाठले.  ढकाही आल्या पावली घरी परतले. मात्र महामार्गावर येणाऱ्या गाड्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढत गेल्यामुळे कालांतराने खासगी वाहनांना अनुमती देण्यात आली.

रावेरहून बुऱ्हाणपूर व बुऱ्हानपूरहून रावेर येणाऱ्या एस. टी. बसेस बंद करण्यात आल्या आहेत. बसेस बंद झाल्यामुळे प्रवाशांनी ऑटो रिक्षाचा मार्ग शोधून काढला. दोन्ही सीमेच्या बाजूला लांब  थांबून प्रवाशांची क्रॉसिंग सुरू असून आपला प्रवास करीत असल्याचे चित्र आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---