⁠ 
सोमवार, डिसेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | कॉप्यांचा पाऊस पडलेल्या जळगाव जिल्हात ‘नो कॉपी केस’

कॉप्यांचा पाऊस पडलेल्या जळगाव जिल्हात ‘नो कॉपी केस’

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ एप्रिल २०२२ । पाच मार्च पासून राज्यासह जिल्ह्यात बारावीच्या बोर्डाच्या पेपरला सुरुवात झाली. नुकतीच हि परीक्षा संपली. जिल्ह्यात सर्रासपणे कॉप्या सुरू असल्याची बातमी दर दोन दिवसांनी कानावर पडत होत्या. बारावीचे सर्व पेपर पूर्ण होऊनही जळगाव जिल्ह्यातील भरारी पथकाला संपूर्ण जिल्ह्यात एकही कॉपी करणारा विद्यार्थी शोधता आला नाहीये. यामुळे भरारी पथक केवळ नावापुरतेच उरले की काय असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाकडून दरवर्षी बोर्डाच्या परीक्षेवेळी भरारी पथकाचे नियोजन करण्यात येते. परीक्षेवेळी कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी या भरारी पथकाचे नियोजन केले जाते. मात्र जळगाव जिल्ह्यातील भरारी पथक हे केवळ नावापुरते उरले असून त्यांना जळगाव जिल्ह्यात एकही कॉपी करणारा विद्यार्थी आढळून आला नाहीये.

जिल्ह्यात परीक्षे वेळी सर्वत्र सर्रासपणे कॉपी सुरू असल्याच्या बातम्या वर्तमानपत्रांमधून दाखवल्या जात होत्या. जळगाव लाईव्ह ने हि याची विशेष बातमी आपल्या पर्यंत पोहोचवली होती , मात् धडधडीत फोटो प्रकाशित करून देखील भरारी पथकाला त्यांच्या कामाबाबत कोणतेही गांभीर्य राहिले नसून बारावीच्या पेपर वेळेस कुठेही अनुचित प्रकार घडला नाही असे त्यांचे म्हणणे आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह