प्रविण गेडामांनंतर दुसऱ्यांदा महापालिका आयुक्तांवर अविश्वास ; वाचा सविस्तर

जुलै 29, 2023 1:26 PM

जळगाव लाईव्ह न्यूज | २९ जुलै २०२३ | जळगाव शहर महापालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्याविरोधात महापौर जयश्री महाजन यांच्याकडे अविश्‍वास प्रस्ताव देण्यात आला आहे. येत्या १ ऑगस्टला त्यावर मतदान घेण्यासाठी महासभा होणार आहे. महापालिकेत आयुक्तांवर दुसऱ्यांदा अविश्‍वास ठराव झाला आहे. यापूर्वी २००६ मध्ये तत्कालीन महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्यावर अविश्‍वास ठराव आणण्यात आला होता.

jalgaon manapa jpg webp webp

जळगाव महापालिकेत सध्या सर्वपक्षीय हितसंबंध जोपासणारे नवे राजकीय समिकरण उदयास आले आहे. महापौर व विरोधीपक्ष नेतेपद एकाच घरात असल्यापासून ठराविक विषयांवर सर्वपक्षीय नगरसेवक एकत्र येणे आता नवीन राहिलेले नाही. जळगाव शहरातील समस्यांबाबत भाजपचे नगरसेवक डॉ. अश्‍विन सोनवणे यांनी साखळी उपोषण सुरू केले. त्यांना सर्वपक्षीय नगरसेवकांचा पाठिंबा मिळाला आहे.

Advertisements

आता महापालिका प्रशासन अकार्यक्षम असून, आयुक्त डॉ. विद्या गायकवाड कामाचे नियोजन करीत नसल्याचा आरोप करत सर्वपक्षीय नगरसेवक त्यांच्या विरोधात एकवटले आहेत. आयुक्तांच्या कामावर अविश्‍वास दाखविणाऱ्या प्रस्तावावर तब्बल ५६ नगरसेवकांनी स्वाक्षऱ्या करून शुक्रवारी सांयकाळी महापौर जयश्री महाजन यांच्याकडे दाखल केला. महापौरांनी हा प्रस्ताव मान्य करून तो विधी शाखेकडे पाठविला. त्यांचे मार्गदर्शन घेऊन १ ऑगस्टला मतदानासाठी सभा घेण्याबाबत त्यांनी नगरसचिवांना कळविले आहे.

Advertisements

महापालिकेत आयुक्तांवर दुसऱ्यांदा अविश्‍वास ठराव झाला आहे. यापूर्वी २००६ मध्ये तत्कालीन महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्यावर अविश्‍वास ठराव आणण्यात आला होता. आता डॉ. विद्या गायकवाड अविश्‍वास ठराव येणाऱ्या दुसऱ्या आयुक्त आहेत. या वेळी विरोधी भाजपने हा प्रस्ताव दिला आहे. सत्ताधारी शिवसेना ठाकरे गटासह सर्वच नगरसेवकांनी त्याला पाठिंबा दिला आहे. राज्यातील सत्ताधारी पक्ष, महापालिकेत सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षाच्या नगरसेवकांकडून आलेला हा प्रथमच अविश्‍वास प्रस्ताव असणार आहे.

डॉ. युवराज परदेशी

पत्रकारिता क्षेत्रात गत १८ वर्षांपासून कार्यरत. कॉर्पोरेट कम्युनिकेशन व लॉबिंग या विषयावर पीएच.डी.चे संशोधन. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. तीन पुस्तके प्रकाशित. दैनिक लोकसत्ता, दैनिक देशदूत मधील कामासह महाराष्ट्र विधीमंडळ वार्तांकनाचा दीर्घ अनुभव. दैनिक जनशक्तीचे माजी निवासी संपादक.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now