जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑगस्ट २०२१ । सर्वसामान्यांसाठी महागाई कमी व्हायला तयार नाही त्यातच आता डाळींचे भाव देखील गगनाला भिडले आहेत मात्र जर येत्या काळात राजस्थानमध्ये चांगल्या प्रकारचा पाऊस झाला नाही तर दिवाळीपर्यंत डाळींचे भाव कमी होणार नाहीत अशी माहिती दाणाबाजार असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पगारिया यांनी जळगाव लाईव्हशी बोलताना दिली.
ते म्हणाले की, पुरेसा पाऊस नसल्याने उत्पादनावर परिणाम झाला आहे त्यामुळे डाळींचे भाव वाढले आहे. सध्या डाळीला मागणी नसली तरी भाववाढ होत आहेत आणि पुढे अजून भाववाढ होण्याची देखील शक्यता आहे. याच बरोबर दर दोन महिन्यांनी ज्याप्रकारे निसर्गात बदल होतो त्यातच जर चांगला पाऊस झाला तर डाळिंचे भाव एखादवेळेस कमी होतील.
या क्षणाला तरी डाळींचे भाव कमी होण्याची कोणतीही आशा दिसत नाही. राज्यात पावसाची स्थिती पाहिली तर अनेक भागात पाऊस कमी असून पश्चिम महाराष्ट्र, कोकण या भागात जास्त पाऊस झाला आहे त्यामुळे कडधान्यांचे मोठे नुकसान झाले असून आता नवीन माल येईल की नाही याबाबत शाश्वती नाही, असेही पगारिया म्हणाले.
काय आहे डाळींचे भाव
उडीद डाळ – १०० रुपये किलो.
तूर डाळ – ९५ रू किलो.
हरभरा डाळ – ७० रू किलो.
मुग डाळ – ८० रू किलो.
मसूर डाळ – ९० रुपये किलो.