---Advertisement---
जळगाव शहर

काँक्रिटीकरणापेक्षा डांबरीकरण करून रस्ते पूर्ण करावेत – नितीन लढ्ढा

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ एप्रिल २०२३ । जळगाव शहरासाठी शंभर कोटीचा निधी मंजूर केल्यानंतर त्याचे मोठ्या प्रमाणावर जाहिरातबाजी करण्यात आली मात्र रस्ते कॉंक्रिटीचे केले तर पुढच्या दोन वर्षात ते पुन्हा फोडावे लागतील. अशा वेळी रस्ते काँक्रिटीकरण न करता ते डांबराचे करावेत व निधीचा योग्य उपयोग करावा जेणेकरून शहरात मोठ्या प्रमाणावर रस्ते बनतील अशा प्रकारची लक्षवेधी नगरसेवक नितीन लड्डा यांनी महासभेत मांडली.

nitin laddha jpg webp webp

जळगाव शहर महानगरपालिकेचे महासभा महानगरपालिकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती यावेळी आयुक्त विद्या गायकवाड महापौर जयश्री महाजन उपमहापौर कुलभूषण पाटील, अधिकारी, कर्मचारी व नगरसेवक यावेळी उपस्थित होते.

---Advertisement---

महासभा सुरू होताच नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी लक्षवेधी मांडण्यासाठी विनंती केली. यावेळी लक्षवेधी मांडत असताना यांनी शहरात सुरू असलेल्या कामांबाबत माहिती दिली. यावेळी नगरसेवकाची लढ्ढा म्हणाले की, जळगाव शहरात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामाबद्दल महानगरपालिकेच्या नगरसेवकांना विश्वासात घेतले जात नाही सर्वजनिक बांधकाम विभाग आपापल्या पद्धतीने सोयीस्कर रित्या महानगरपालिकेला डावलून काम करत आहे. अशावेळी महानगरपालिकेला सार्वजनिक बांधकाम विभागांमध्ये विलीन करावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

याचबरोबर जर आज शहरातील रस्ते काँक्रीटचे केले तर येत्या काळात होणाऱ्या अमृत योजनेच्या कामावेळी ते पुन्हा फोडावे लागतील आणि काँक्रिटच्या रस्त्यामध्ये प्रशासनाने दिलेला पैसा अक्षरशः वाया जाईल. यामुळे निधीचा योग्य उपयोग करून काँक्रिटचे रस्ते न करता केवळ ते डांबराचे करावे असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.

याचबरोबर ते म्हणाले की, कोंकिटीकरण करून रस्ते बनवले तर शहरातील केवळ 41 किलोमीटरचे रस्ते होतील. मात्र तेच जर डांबरीकरण करून बनवले त्या शहराचे 119 किलोमीटरचे रस्ते होतील. यामुळे अधिक प्रमाणावर नागरिकांना हे सोयीचे होईल.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---