Jalgaon : लाच प्रकरणी शाळेचा मुख्याध्यापक जळगाव एसीबीच्या जाळ्यात

मे 30, 2025 10:04 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मे २०२५ । जळगाव जिल्ह्यात आठवड्यातून एक तरी लाचेची बातमी समोर येत असून अशातच निपाणे (ता. एरंडोल, जि. जळगाव) येथील शाळेच्या मुख्याध्यापकाला लाच प्रकरणी एसीबीने अटक केली. संदिप प्रभाकर महाजन (वय 45) असं अटक केलेल्या मुख्याध्यापकाचे नाव असून विशेष म्हणजे तक्रारदाराकडून यापूर्वीही लाच स्वीकारल्याप्रकरणी मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल होता. आता या कारवाईने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

lach jpg webp

नेमका प्रकार काय?
तक्रारदार हे निपाणे (ता. एरंडोल) येथील संत हरिहर महाराज माध्यमिक शाळेत शिपाई असून संदीप महाजन हे शाळेचे मुख्याध्यापक आहेत. तक्रारदार यांनी त्यांच्या पत्नीचे 23815/-रुपयाचे मेडिकल मंजूर होनेकामी मुख्याध्यापक महाजन यांच्याकडे सादर केले होते. सदर मेडिकल बिल स्वतःचे वैयक्तिक ओळखीने सिव्हिल हॉस्पिटल जळगाव व वेतन अधीक्षक माध्यमिक शिक्षण विभाग जळगांव यांच्याकडे प्रस्ताव सादर करून मंजूर करून देण्याचे मोबदल्यात मुख्याध्यापक यांनी तक्रारदार यांच्याकडे 5000/- रुपये लाचेची मागणी केली होती.

Advertisements

याबाबत तक्रारदार यांनी दिनांक 21/12/2024 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगांव येथे तक्रार दिली होती. सदर तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी केली असता मुख्याध्यापक महाजन यांनी तक्रारदार यांच्या पत्नीचे 23815/-रुपयांचे मेडिकल बिल मंजूर करून आणून देण्याचे मोबदल्यात तडजोडी अंती सदर मेडिकल बिलाच्या एकूण रकमेच्या 15 % प्रमाणे 3600/-रुपयांची लाचेची मागणी करून सदर ती मिळविण्याचा प्रयत्न केला. म्हणून मुख्याध्यापक संदीप महाजन यांच्याविरुद्ध कासोदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू आहे.

Advertisements

दरम्यान मुख्याध्यापक संदिप महाजन यांनी या अगोदर तक्रारदार शिपाई यांचेकडून वेतन निश्चितीच्या फरकाचे 2,53,780/- रु. फरकाचे 5 टक्के प्रमाणे 12500/- रू. ची मागणी करून तक्रारदार याचेकडून 10000/- रु. लाच रक्कम स्विकारली होती. म्हणून मुख्याध्यापक संदिप महाजन यांचे विरुद्ध कासोदा पोलीस स्टेशन गुरं न 105/2024 भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन 1988 चे कलम 7 अ प्रमाणे दि.27/06/2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता

यांनी केली कारवाई
जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, एएसआय सुरेश पाटील, किशोर महाजन, बाळू मराठे, प्रदीप पोळ आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment