---Advertisement---
चाळीसगाव

गुप्तधनासाठी अघोरी कृत्याचा प्रयत्न फसला ; चाळीसगावात मुद्देमालासह 9 जण ताब्यात..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जुलै २०२३ । चाळीसगावातून एक धक्कादायक घटना समोर आली. अघोरी पुजा करून गुप्तधन मिळविण्याच्या शोधात असलेल्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आला असून ९ जणांना ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, यावेळी मोबाईल, कार आणि अघोरी पुजा करण्याचे साहित्य असा एकुण ८ लाख ३५ हजारांचा मु्देमाल हस्तगत केला आहे.

aghori puja jpg webp webp

काय आहे नेमका प्रकार?
समोरील शेतातील पडीत घरात काही लोक अघोरी पूजा करण्यासाठी एकत्रित जमणार आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांचे पथक तेथे गेले होते. त्याठिकाणी नऊ जण गोलाकार स्थितीत जमिनीवर बसून मानवी कवटी, लिंबू, नारळ, रुद्राक्ष माळ, देवाची पितळी मूर्ती, चांदीच्या पत्राचा छोटा नाग, पत्रावरील छापील देव, कंदमुळे अशा विविध साहित्याची पूजा मांडून गुप्तधनासाठी अघोरी कृत्य करून जादूटोणा करीत असल्याचे दिसून आले.

---Advertisement---

या सर्व जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून आठ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यात कार (क्र. एम.एच.१६, ए.टी. ७५५७) चाही समावेश आहे. याप्रकरणी अघोरी विद्येच्या साहाय्याने गुप्तधन शोधणेसह इतर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सपोनि सागर ढिकले व पोकॉ प्रकाश पाटील हे करीत आहेत.

यांना घेतले ताब्यात
लक्ष्मण शामराव जाधव (वय- 45 वर्ष रा. खडकी बायपास ता. चाळीसगांव जि.जळगाव), शेख सलीम कुतुबुददीन शेख (वय- 56 वर्ष रा. हजरत अली चौक नागद रोड चाळीसगांव जि.जळगाव), अरूण कृष्णा जाधव (वय 42 वर्ष रा.आसरबारी ता.पेठ जि.नाशिक), विजय चिंतामन बागुल (वय-32, वर्ष रा. जेल रोड नाशिक), राहुल गोपाल याज्ञीक (वय-26, वर्ष रा. ननाशी ता.दिंडोरी जि.नाशिक), अंकुश तुळशीदास गवळी (वय 21 वर्ष रा. जोरपाडा ता. दिंडोरी जि.नाशिक), संतोष नामदेव वाघचौरे (वय 42 वर्ष रा.अशोकनगर नाशिक), कमलाकर नामदेव उशीरे (वय 47 वर्ष रा.गणेशपुर पिंप्री ता.चाळीसगाव जि.जळगाव), संतोष अर्जुन बाविस्कर (वय-38, वर्ष रा.अंतुर्ली (कासोदा) ता.एरंडोल जि.जळगाव) यांना ताब्यात घेतले.

पोलीस प्रशासनाचे आवाहन
अघोरी विद्याच्या सहाय्याने गुप्तधन शोधणे, चमत्काराचा प्रयोग प्रसारीत करणे व आर्थिक फसवणुक करणे, नरबळी देणे, अमानुष कृत्य करण्याचा सल्ला देणे, पैशाचा पाउस पाडणे, अघोरी उपाय करुन रुग्णांवर उपचार करणे किंवा भाणामती करणे, अतिंद्रीय शक्ती असल्याचे भासवुन लोकांमध्ये दहशत करणे, मंत्रांच्या सहाय्याने भुत पिसाच्य दुर करण्याबाबत शक्ती असल्याचे भासवुन उपचार करणे, मानसिक विकलांग व्यक्तींमध्ये अमानवी शक्ती असल्याचे भासवुन त्यादवारे इतरांची फसवणुक करणे, अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या इसमांबाबत माहीती प्राप्त झाल्यास तात्काळ पोलीसांना माहीती कळवावी जेणेकरुन अशा गुन्ह्यातील आरोपीतांना कायमचा पायबंद घालणेकामी वेळीच मदत होईल याबाबत चाळीसगाव शहर पोलीसांकडुन आवाहन करण्यात येत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---