⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

नीलगायीची दुचाकीला धडक, पोलिसामुळे वाचला दोघांचा जीव

Pachora News-जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जुलै २०२२ । पाचोरा तालुक्यातील कोकडी तांडा येथील‎ दोन जण‎ शेंदुर्णी येथून अंबेवडगावकडे दुचाकीने येत होते.‎ वाटेत राखीव जंगल परिसरात‎ अचानक नीलगाय दुचाकीसमोर आल्याने अपघात‎ झाला. दरम्यान, पोलिस हेडकॉन्स्टेबल विनोद पाटील हे‎ तेथून जात असताना त्यांना दुचाकीवरील दोघे रस्त्याच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांनी लागलीच पाचोऱ्यातील खासगी‎ रुग्णालयात पोहोचवले. त्यांना वेळीच उपचार मिल्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र, एकाचा हात मोडला गेला आहे.

सुभाष राठोड व ताराचंद‎ राठोड अशी जखमींची नावे आहेत. हे दोघी २३ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शेंदुर्णी येथून अंबेवडगाव येथे येत असताना त्यांच्या दुचाकी समोर नीलगाय आल्याने अपघात‎ होऊन दोघे रस्त्याच्या थारोळ्यात पडले. त्याचवेळी काही इसम या ठिकाणी जमले होते. परत्नू मदती ऐवजी फोटो काढण्यात मग्न होते. अपघातग्रस्त मदतीची हाक देत होते. परंतु, त्याच्या मदतीसाठी कुणी धावून येत नव्हतं. दरम्यान, पोलिस हेडकॉन्स्टेबल विनोद पाटील हे‎ तेथून जात असताना त्यांना दुचाकीवरील दोघे रस्त्याच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांनी क्षणाचा ही विलंब न करता ऱ्यांना लागलीच पाचोऱ्यातील खासगी‎ रुग्णालयात पोहोचवले.

त्यामुळे पोलिस हेडकॉन्स्टेबल विनोद पाटील यांच्या वेळीच मदतीमुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, वनविभागाने‎ राखीव जंगल परिसरातून जाणाऱ्या रस्त्यावर‎ सावधगिरीची सूचना देणारे फलक लावावे. जंगल‎ परिसरात जाळी लावावी, अशी मागणी होत आहे.‎