⁠ 
रविवार, मे 5, 2024

केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या संस्थेत 10वी/ITI/12वी पाससाठी बंपर जागा रिक्त

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्थामार्फत विविध पदांसाठी भरती होणार असून याबाबत नुकतीच अधिसूचना प्रसिद्ध झाली. या भरती अंतर्गत एकूण ८० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून ३१ ऑक्टोबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. NIELIT Recruitment 2023

पदाचे नाव आणि रिक्त पदसंख्या :
ड्राफ्ट्समन C – ०५ जागा
लॅब असिस्टंट B – २० जागा
लॅब असिस्टंट A – ०५ जागा
ट्रेड्समन B – २६ जागा
हेल्पर B – २४ जागा
एकूण पदसंख्या – ८० जागा

वयोमर्यादा: १८ वर्षे ते कमाल २७ वर्षे
अर्ज फी: २०० रुपये तर मागासवर्गीय/ महिला/ PWD यांना शुल्क माफ आहे.

Online अर्ज: Apply Online 

शैक्षणिक पात्रता:
ड्राफ्ट्समन C – कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून दहावी परीक्षा उत्तीर्ण आणि मेकॅनिकल विषयात ‘आयटीआय’ सह संबधित कामाचा ०६ वर्षांचा अनुभव.
लॅब असिस्टंट B – कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून विज्ञान शाखेतून बारावी परीक्षा उत्तीर्ण आणि संबधित कामाचा ०२ वर्षांचा अनुभव.
लॅब असिस्टंट A -कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून विज्ञान शाखेतून बारावी परीक्षा उत्तीर्ण किंवा दहावी उत्तीर्ण आणि संबधित कामाचा ०२ वर्षांचा अनुभव.
ट्रेड्समन B – कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून दहावी परीक्षा उत्तीर्ण आणि इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स विषयात ‘आयटीआय’चा दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असणे आवश्यक..
हेल्पर B – कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून दहावी परीक्षा किंवा त्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावी.

जाहिरात (Notification): पाहा