⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | नोकरी संधी | क्या बात है ! राज्यातील ‘या’ ठिकाणी कुठलीही परीक्षा न देता थेट नोकरीची संधी.. 60000 पर्यंत पगार मिळेल

क्या बात है ! राज्यातील ‘या’ ठिकाणी कुठलीही परीक्षा न देता थेट नोकरीची संधी.. 60000 पर्यंत पगार मिळेल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी संधी चालून आलीय. राष्ट्रीय आरोग्य अभियान,रायगड (National Health Mission Raigad) येथे विविध रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (NHM Raigad Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे.पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपास्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 10, 12 आणि 17 ऑगस्ट 2022 असणार आहे.

एकूण पदसंख्या : ९२

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

वैद्यकीय अधिकारी : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी M.B.B.S पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

स्टाफ नर्स (Staff Nurse) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 12th Pass with G.N.M. Course पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

MPW (MPW) : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 12Th Science +Paramedical Basic Training Course पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

वयाची अट : 38 ते 70 वर्ष[राखीव प्रवर्ग – ०५ वर्षे सूट]

वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये.

निवड पद्धती : मुलाखतीद्वारे
मुलाखतीचा पत्ता : 4 था मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, शिवतीर्थ, रायगड, जिल्हा परिषद अलिबाग
मुलाखतीची तारीख : 10, 12 आणि 17 ऑगस्ट

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.