---Advertisement---
गुन्हे बोदवड

धक्कादायक : लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी नवविवाहितेने उचललं टोकाचं पाऊल

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जानेवारी २०२२ । विवाह झाल्यानंतर माहेरी आलेल्या नवविवाहितेने विषारी द्रव सेवन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. भुसावळ तालुक्यातील शिंदी येथे ही घटना घडली असून पुजा रविंद्र चौधरी (22) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी तिने आत्महत्या केल्याने समाजमन सुन्न झाले.

pooja chaudhari succied jpg webp

काय आहे घटना
खडका येथून जवळच असलेल्या शिंदी येथील पूजा पाटील या २२ वर्षीय युवतीचे रविवारी विचवा (ता. बाेदवड) येथील मिलन पाटील या युवकाशी लग्न झाले.संबंधित युवतीचे हे दुसरे लग्न होते. रविवारी लग्न झाल्यावर पूजा पाटील ही नवविवाहिता साेमवारी शिंदी येथे माहेरी आली हाेती. मात्र बुधवारी पूजाने विषारी द्रव सेवन केले. तिला त्रास जाणवू लागल्याने तत्काळ भुसावळातील खासगी हाॅस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारानंतर तिची प्रकृती सुधारल्याने तिला घरी नेण्यात आले. मात्र, घरी आल्यानंतर पुन्हा प्रकृती खालावल्याने तिला बुधवारी उपचारासाठी जळगावला खासगी रुग्णालयात हलवले होते. मात्र उपचार सुरू असतानाच पूजाचा मृत्यू झाला.

---Advertisement---

लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी तिने आत्महत्या केल्याने समाजमन सुन्न झाले. या घटनेचे कारण स्पष्ट झालेले नाही. पूजाच्या वडिलांचे १३ वर्षांपूर्वी अपघातात निधन झाले आहे. तर तिची आई माहेरी असते. त्यामुळे पूजासह तिची एक बहीण व भाऊ अशा तिघांचा सांभाळ तिच्या आजीने केला. पूजाने टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण समोर आलेले नाही. कारणांचा पोलिस शोध घेत आहेत.

हे देखील वाचा :

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---