जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑक्टोबर २०२५ । दिवाळीनंतर आता परतीच्या प्रवासाला निघाल्याने रेल्वे गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी दिसून येत आहे. याच दरम्यान मध्य रेल्वेनं जळगाव आणि भुसावळ मार्गे मुंबई, नागपूर, पुणे दरम्यान अतिरिक्त विशेष चार गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांमुळे जिल्ह्यातील प्रवाशांची सोय होणार आहे.

या एक्स्प्रेस गाड्यांच्या कमी फेऱ्या असल्या तरी प्रवाशांची गर्दीतून सुटका होण्यासाठी गर्दीच्या सिझनमध्ये मदत होणार आहे. दिवाळीनंतर मोठ्या शहराकडे परतीच्या प्रवासासाठी अनेक गाड्यांना नो रूम असल्याने विशेष गाड्यांमुळे प्रवाशांची सोय होणार आहे.

मुंबई-नागपूर-मुंबई
रेल्वे क्र. ०१०११ : मुंबई-नागपूरही २६, २८ आणि ३० ऑक्टोबरला पहाटे १२.२० वाजता मुंबईतून सुटेल. याच दिवशी सकाळी ७.४२ वाजता जळगावात थांबा घेईल, त्यानंतर नागपूरला रवाना होईल.
रेल्वे क्र. ०१०१२ : नागपूर-मुंबई रेल्वे ही २६, २८ आणि ३० ऑक्टोबर रोजी रात्री १०.१० वाजता नागपूर येथून सुटेल. दुसऱ्या दिवशी पहाटे ४.२८ वाजता जळगावात थांबा घेईल, नंतर मुंबईसाठी रवाना होईल. या रेल्वेला दोन वातानुकूलित द्वितीय, एक वातानुकूलित तृतीय, १२ शयनयान, चार सामान्य द्वितीय आणि दोन सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे या गाडीला राहणार आहेत.
पुणे-नागपूर-पुणे
रेल्वे क्र. ०१४०९ : पुणे- नागपूर रेल्वे २७ आणि २९ ऑक्टोबरला रात्री ८.३० वाजता पुण्यातून सुटेल. दुसऱ्या दिवशी पहाटे ५.५५ वाजता जळगावात थांबा घेईल. यानंतर नागपूरच्या दिशेने रवाना होईल.
रेल्वे क्र. ०१४१० : नागपूर-पुणे
रेल्वे ही २६, २७ आणि ३० ऑक्टोबर रोजी दुपारी ४.१० वाजता नागपूर येथून सुटेल. या दिवशी रात्री ११.५३ वाजता जळगावात थांबा घेऊन पुण्याकडे रवाना होईल. या रेल्वेंना एक वातानुकूलित द्वितीय, ११ शयनयान, सात सामान्य द्वितीय आणि दोन सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन अशी डब्यांची संरचना असेल.








