जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑगस्ट २०२५ । भारतात सणासुदीच्या काळात रेल्वे गाड्यांमध्ये पाय ठेवायला जागा नसते. दरम्यान अनेक गैरसोयीचा सामना करून प्रवास करावा लागतो. आता ऑगस्ट महिन्यापासून सणासुदीचे दिवस सुरु होत आहे. यातच भुसावळ जळगाव मार्गे पुण्याला जाण्यासाठी मोजक्याच गाड्या धावत असून यातही कन्फॉर्म शीट मिळणे कठीण होते. अशातच रेल्वे भुसावळमार्गे पुण्यासाठी नवीन ट्रेन सुरु केली आहे.

ती म्हणजे रिवा आणि पुणे या दरम्यान रविवार, ३ ऑगस्टपासून नवीन एक्सप्रेस सुरू होणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील.या नव्या एक्सप्रेसचा भुसावळकरांना फायदा होणार आहे. मात्र या गाडीला जळगाव स्थानकांवर थांबा नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे.

भारतीय रेल्वे नवीन पुणे -रिवा -पुणे एक्सप्रेस सुरू करण्यात येणार आहे. या दोन शहरांना जोडणारी ही (कनेक्टिव्हिटी) पहिली ट्रेन असेल. ही ट्रेन आरक्षित आणि अनारक्षित प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन सुरू करण्यात येत आहे.

खरंतर जळगाव जिल्ह्यातील अनेक जण शिक्षण, नोकरी, व्यवसायासाठी पुण्याला जातात. कोरोनाआधी भुसावळहुन पुण्यासाठी हुतात्मा एक्स्प्रेस धावत होती. ही ट्रेन जळगाव जिल्ह्यालाच नव्हे तर संपूर्ण खान्देशातील महत्वाची ट्रेन होती. मात्र मागच्या काही वर्षात तिला अमरावती ते पुणे अशी करण्यात आल्याने खान्देशातील प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. त्यातच भुसावळ जळगाव मार्गे पुण्याला जाण्यासाठी मोजक्याच गाड्या धावतात. त्यातही कन्फॉर्म तिकीट मिळणे कठीण होते. यातच आता पुणे -रिवा -पुणे एक्स्प्रेस सुरु होणार असल्याने काहीसा दिलासा मिळाला. मात्र या ट्रेनला जळगावला थांबा नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे.
पुणे-रिवा ट्रेनचे वेळापत्रक?
ट्रेन क्र. 20151 पुणे–रिवा एक्सप्रेस दर गुरुवारी १५.१५ वाजता पुणे स्थानकातून प्रस्थान करेल आणि दुसऱ्या दिवशी १७.३० वाजता रिवा स्थानकावर पोहोचेल. तर ही ट्रेन रात्री २२.४० वाजता भुसावळ स्थानकावर पोहोचले.
ट्रेन क्र. 20152 रिवा–पुणे एक्सप्रेस दर बुधवारी ०६.४५ वाजता रिवा स्थानकातून प्रस्थान करेल आणि दुसऱ्या दिवशी ०९.४५ वाजता पुणे स्थानकावर पोहोचेल. तर रात्री १२ वाजून ४० मिनिटाने भुसावळला पोहोचले.
कोणकोणत्या स्थानकावर ही ट्रेन थांबणार –
दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, बालाघाट, नैनपूर, जबलपूर, कटनी आणि सतना.
एक्सप्रेसची रचना कशी असेल?
२ वातानुकूलित द्वितीय श्रेणी, ३ वातानुकूलित तृतीय श्रेणी, ३ इकोनॉमी वातानुकूलित तृतीय श्रेणी, ६ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी, १ द्वितीय आसन व्यवस्था असलेला गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर व्हॅन, असे सरंचना असेल.






