⁠ 
शनिवार, जुलै 20, 2024

अमृत योजनेअंतर्गत नवीन नळ कनेक्शन घेतले का?; ‘ या’ भागातील जुना नळ आता होणार बंद

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज| १२ ऑगस्ट २०२३। शहरात अमृत योजनेअंतर्गत नळ जोडणीचे काम जोमाने सुरू करण्यात आले आहे. बऱ्याच ठिकाणी अमृतचा पाणीपुरवठा सुरू झालेला आहे. अशा ठिकाणी आता जुन्या जलवाहिनद्वारे होणारा पाणीपुरवठा बंद केला जात आहे. शहरातील २६ कॉलन्यांमध्ये १ जुलैपासून अमृत योजनेचा पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. तेथे अमृतचे नळ कनेक्शन जोडून घेण्यासाठी महापालिकेने आठ दिवसांची मुदत दिली आहे.

हेमुकलानी जलकुंभ झोनअंतर्गत सिंधी कॉलनी, टीएम नगर, जोशी कॉलनी, रणछोड नगर, देविदास कॉलनी, वर्षा कॉलनी, ईश्वर कॉलनी, सम्राट कॉलनी, मासूमवाडी, कासमवाडी, रचना कॉलनी, एकता कॉलनी, अरिहंत कॉलनी, कंजरवाडा, जाखनी नगर, नाथवाडा, सर्वोत्तमनगर, ढाकेवाडी, लक्ष्मी नगर, मुकुंद नगर, गणेशवाडी, मंजुषा सोसायटी, जानकी नगर, तुकाराम वाडी, दीक्षित वाडी व वानखेडे सोसायटी या परिसरात १ जुलैपासून नियमित अमृत योजनेच्या पाईपलाईन द्वारे पाणीपुरवठा सुरू झाला आहे. १८ ऑगस्ट नंतर जुन्या जलवाहिन्यांवरील पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे.