जळगाव लाईव्ह न्यूज । २१ एप्रिल २०२२ । येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे दुचाकी वाहनांची नवीन नोंदणी एमएच-१९, डी.वाय ०००१ ते ९९९९ पर्यंतची मालिका २७ एप्रिलपासून सुरू होत आहे.
२५ एप्रिल दुपारी ४ वाजेपर्यंत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात अर्ज, शासकीय शुल्काचा डीडी सादर करावा. एकापेक्षा जास्त अर्ज आलेल्या क्रमांकाच्या बाबतीत २६ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यत वाढीव शुल्काचा डीडी स्वतंत्र बंद लिफाफ्यातून सादर करणे बंधनकारक असल्याचे कळविण्यात आले आहे.