मोठी बातमी! गॅस सिलिंडरबाबत नवीन नियम जारी, फक्त ‘या’ लोकांना मिळणार सबसिडीचे पैसे
जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑक्टोबर २०२२ । पेट्रोल-डिझेलसह (Petrol Diesel) गॅस दरवाढीने (gas cylinders) सर्वसामान्य जनता होरपळून निघाली आहे. देशातील अनेक ठिकाणी अद्यापही पेट्रोल १०० रुपयांहून अधिकने विकले जात आहे. तर घरगुती गॅस सिलिंडर एक हजाराहून अधिकने विकले जात आहे. गॅसचे दर कधी कमी होणार याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, अशातच सर्वसामान्यांसाठी एक मोठी बातमी आहे. ती म्हणजे तुम्ही एका वर्षात किती सिलिंडर घेऊ शकता. त्याचे नवे नियम जारी करण्यात आले आहेत. तुम्ही एका वर्षात किती सिलिंडरसाठी अर्ज करू शकता ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तसेच सबसिडीचे पैसे कोणाला मिळणार याबाबतही सांगणार आहोत. Gas Cylinder New Rule
सिलिंडरची निश्चित संख्या
आतापासून ग्राहकांसाठी एलपीजी सिलिंडरची संख्या निश्चित करण्यात आली आहे. आतापासून कोणताही ग्राहक एका वर्षात केवळ 15 सिलिंडर बुक करू शकतो. म्हणजेच आता तुम्ही एका वर्षात 15 पेक्षा जास्त सिलिंडर घेऊ शकणार नाही. त्याच वेळी, तुम्ही एका महिन्यात 2 पेक्षा जास्त सिलिंडर घेऊ शकत नाही.
ठराविक महिन्याचा कोटा
हे सिलिंडर घेण्यासाठी नवीन नियम करण्यात आले असून, आतापर्यंत सिलिंडर घेण्यासाठी काही महिने किंवा वर्षांचा कोटा निश्चित करण्यात आला नव्हता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका वर्षात अनुदानित सिलिंडरची संख्या 12 झाली आहे, जर तुम्ही 15 सिलिंडर घेतले तर तुम्हाला फक्त 12 वर सबसिडी मिळेल.
ऑक्टोबरमध्ये नवीन दर जाहीर करण्यात आले
IOC नुसार, 1 ऑक्टोबरपासून गॅसच्या नवीन किमती जाहीर झाल्या आहेत, त्यानंतर दिल्लीत सिलेंडरची किंमत 1053 रुपये, मुंबईत 1052.5 रुपये, चेन्नईमध्ये 1068.5 रुपये आणि कोलकातामध्ये 1079 रुपये आहे.