देशातील करोडो सर्वसामान्य लोकांना केंद्र सरकारकडून रेशन कार्डद्वारे जीवनावश्यक वस्तू मिळतात. यामध्ये गहू,तांदूळ, तेल, साखर या गोष्टींचा समावेश आहे. भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये राज्य सरकार रेशन कार्ड देतात. राज्य सरकार या रेशनच्या किंमती ठरवतात.
आता या राज्याच्या सरकारने रेशन कार्डच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. आता नागरिकांना फक्त ४५० रुपयांमध्ये गॅस सिलेंडर मिळणार आहे. राजस्थान सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. राजस्थानमधील नागरिकांना या योजनेचा चांगला लाभ मिळणार आहे.
रेशन कार्डधारकांना कमीत कमी किंमतीत मिळणार सिलेंडर
रेशन कार्ड धारकांना नॅशनल फूड सिक्युरिटी अॅक्ट म्हणजे एनएफएसएअंतर्गत कमीत कमी किंमतीत गॅस सिलिंडर दिला जायचा. मात्र, आता रेशन कार्ड धारकांना फक्त ४५० रुपयांमध्ये गॅस सिलेंडर देण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थान सरकारने रेशन कार्डच्या नियमांमध्ये बदल केले आहे.
राजस्थान सरकारकडून सुरुवातील फक्त उज्जवला योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना ४५० रुपयांमध्ये गॅस सिलेंडर दिला जात होता. मात्र, आता रेशन कार्डधारकांनादेखील ४५० रुपयांमध्ये गॅस सिलेंडर दिला जाणार आहे. यासाठी नागरिकांना रेशन कार्ड आणि एलपीजी आयडी लिंक करावा लागणार आहे.
राजस्थानमध्ये सध्या १,०७,३५,००० पेक्षा जास्त लोक नॅशनल फूड सिक्युरिटी अॅक्टच्या लिस्टमध्ये आहेत. त्यातील ३७ लाख परिवारांना बीपीएल आणि उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभ मिळतो. त्यामुळेच आता उरलेल्या ६८ लाख कुटुंबाना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
रेशन कार्ड केवायसी करणे गरजेचे
सरकारच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी केवायसी करणे गरजेचे आहे. रेशन कार्ड केवायसी केल्यानंतरच तुम्हाला कमी किंमतीत सिलेंडर मिळणार आहे. यासाठी तुम्हाला रेशन कार्ड आणि एलपीजी आयडी सीडिंग करावे लागणार आहे. तेव्हाच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे.