जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मार्च २०२१ । कोविड केअर सेंटर, डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर, डेडीकेटेड कोविड हाॅस्पिटलमध्ये कोरोना बाधित रूग्णांवर उपचार करण्याबाबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी मार्गदर्शक तत्व जाहीर केले आहे.
सौम्य / अतिसौम्य किंवा लक्षणे नसलेल्या कोविड पॉझिटीव्ह रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करणेबाबत तसेच अपवादात्मक परिस्थितीत घरी विलगीकरणाचा पर्याय व गृह उपचार करण्याबाबत या कार्यालयाचे संदर्भिय परिपत्रकानुसार सुचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. लक्षणे नसलेल्या कोविड पॉझिटीव्ह रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये मध्ये दाखल न करता कोविड-19 बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात यावे.
तसेच ऑक्सिजनची आवश्यकता नसतांना देखील DCHC, DCH मध्ये या रुग्णांना ऑक्सिजन बेड देण्यात येत असल्याची बाब जिल्हाधिकारी राउत यांच्या निदर्शनास आलेली आहे. याबाबत त्यांनी सर्व संबंधितांना सुचना निर्गमित केल्या आहेत.
काय आहेत सूचना?
1) सौम्य/अतिसौम्य किंवा लक्षणे नसलेल्या कोविड पॉझिटीव्ह रुग्णांना Covid Care Centre मध्ये दाखल करण्यात यावे
2) DCHC मध्ये केवळ ऑक्सिजनची गरज असलेले कोविड पॉझिटीव्ह / संशयीत रुग्णांवर उपचार करावा.
3) DCH दर्जाच्या रुग्णालयात अत्यवस्थ / आयसीयु रुग्णांना प्राधान्य देण्यात यावे. तसेच 02 वर असणा-या परंतु स्थिर रुग्णांना DCHC मध्ये संदर्भित करावे.
वरील प्रमाणे सुचनांचे पालन होत आहे किंवा नाही याबाबतची जबाबदारी अधिष्ठाता , शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगांव व जिल्हा शल्य चिकीत्सक जळगांव यांना देण्यात आलीय.. तसेच याबाबत उल्लंघन होत असल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहे.