⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | महाराष्ट्र | राज्यात पुन्हा हुडहुडी वाढणार ; नेमका कसा आहे हवामान खात्याचा नवीन अंदाज?

राज्यात पुन्हा हुडहुडी वाढणार ; नेमका कसा आहे हवामान खात्याचा नवीन अंदाज?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जानेवारी २०२३ । राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर भारतात अद्यापही थंडीचा कडाका कायम आहे. राज्यातील इतर भागात थंडीचा जोर २६ जानेवारीपर्यंत कमी होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. मात्र, नवीन अंदाजानुसार आता पुन्हा राज्यात हुडहुडी वाढणार आहे.

हवमान विभागाच्या अंदाजानुसार २९ जानेवारीनंतर महाराष्ट्रात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. तर ही थंडीची लाट २ फेब्रुवारीपर्यंत कायम राहिल, अशीही शक्यता आहे. उत्तरेतील राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढत आहे. जम्मू-काश्मीर बर्फाने आच्छादले आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक भागात थंडीचा जोर वाढणार आहे. ३० जानेवारीपासून तापमानात लक्षणीय घट होईल, असंही हवामान विभागाकडून सांगण्यात येतंय.

दरम्यान, राज्यात गेल्यात तीन दिवसांपासून‎ वातावरण ढगाळ असून ढगाळ वातावरणामुळे‎ थंडीची तीव्रता घटली. तर राज्यातील काही ठिकाणी‎ अवकाळी पावसाने हजेरी‎ लावल्यानंतर काल बुधवारी उत्तर‎ महाराष्ट्रात पहाटेच्या वेळी तुरळक‎ ठिकाणी पावसाच्या सरी काेसळल्या.‎ दरम्यान, राज्यातील ढगाळ स्थिती‎ आणखी दाेन दिवस कायम राहणार‎ असून शनिवारपासून ढगाळ‎ वातावरण निवळू शकते.

ढगाळ वातावरणामुळे‎ किमान‎ तापमानात तीन ते चार अंश‎ सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे.‎ जळगाव जिल्ह्यात कमाल तापमान‎ २८.७ अंश सेल्सिअस तर किमान‎ तापमान १६.४ अंश सेल्सिअस एेवढे‎ नाेंदवले गेले. राज्यावरील ढगाळ‎ स्थितीने २४ जानेवारी राेजी‎ मराठवाड्यासह उत्तर महारा‌ष्ट्रात‎ काही ठिकाणी अवकाळी पावसाच्या‎ सरी काेसळल्या आहेत. जळगाव‎ जिल्ह्यात बुधवारी सकाळी ११‎ वाजेपर्यंत तब्बल ७१ टक्के आकाश‎ ढगाच्छादित असल्याचे समाेर आले.‎

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.