महाराष्ट्र

नव्या शैक्षणिक पद्धतीमुळे सामर्थ्यशाली भारत घडेल : बागुल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । “भारताचे नवे शैक्षणिक धोरण हे उद्याच्या प्रगत भारताचे रूप आहे.स्वातंत्र्यानंतर प्रथमच राबविले जात असलेल्या या दर्जेदार धोरणाची सर्व अंगे शिक्षकांनी आत्मसात करावीत व नव्या धोरणाची अंबलाबजवनी करण्यास स्वतःला सक्षम करावे” असे आवाहन ज्येष्ट पत्रकार तथा माजी प्राचार्य भगवान बागुल यांनी मालेगाव येथे केले.

मालेगाव येथील कर्मवीर दोधू आनंदा बोवा गुरुजी शिक्षण संस्थेच्या शिक्षकांची सहविचार सभा सर्वोदय वाचनालयाच्या सभागृहात काल झाली त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा आशा खरे होत्या. बागुल पुढे म्हणाले ‘नवे शैक्षणिक धोरण देशाच्या प्रगतीची दिशा ठरविणारे असून ते मातृभाषेतून दिले जाणार आहे .यामुळे भारत जगात नेतृत्व करेल एवढी क्षमता याच्यात आहे.या शिक्षणातून निर्माण झालेला युवक नोकरी मागणारा न होता तो देणारा बनेल. तरुणाई मध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याबरोबरच तरुणाई व्यवहार कुशल बनेल. भारत जागतिक शिक्षणाचे केंद्र बनेल या धोरणाने स्वातंत्र्यानंतर प्रथमच नवीन पहाट उगवेल. या शिक्षणाने अपार संधीत रूपांतर होईल असे सांगून त्यांनी शिक्षकांनी प्रयोगशील बनले पाहिजे. परिवर्तनाच्या प्रक्रियेत स्वयंस्फूर्तीने पुढे आले पाहिजे.

भविष्यात जात धर्म पाहून नोकऱ्या दिल्या जाणार नाहीत तर ज्याच्याजवळ कौशल्य असेल तोच नोकरीचा हकदार बनेल .घोका आणि ओका असे शैक्षणिक युग संपले असून गुणांपेक्षा सर्वांगीण विकास झालेलाच विद्यार्थी काळाचे आव्हाने पेलेल, म्हणूनच विविध खेळ सामान्य ज्ञान वाढीसाठीचे प्रयोग या बाबींसाठी शिक्षकांनी कटाक्षाने लक्ष द्यावे. आर्थिक दृष्ट्या दुर्बल व दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थ्यांना प्रगत विद्यार्थ्यांबरोबर आणण्याची आपली जबाबदारी आहे शिक्षकांनी हे आव्हान समजून ते स्वीकारावेअसेही त्यांनी सुचित केले.

यावेळी संस्थेमार्फत राबविल्या जाणाऱ्या प्रकल्पांची माहिती संस्थेच्या अध्यक्षा आशा खरे यांनी दिली. यावेळी संस्थेचे सचिव अमित खरे यांनी नव्या शैक्षणिक धोरण संदर्भात लवकरच शिबिर आयोजित केले जाईल अशी घोषणा केली. यावेळी विविध शाळांच्या प्रगतीचे अहवाल सादर करण्यात आले त्यात मनीषा पवार, पगार आदींनी अहवाल सादर केले. यावेळी विविध क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या संस्थेच्या गुणवंत शिक्षकांना पत्रकार भगवान बागुल यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आली. प्राचार्य धनंजय पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले प्रशांत ठाकरे यांनी आभार मानले.

Related Articles

Back to top button