जळगाव लाईव्ह न्यूज । २ सप्टेंबर २०२२ । मुक्ताईनर तालुक्यातील कुंडी गावाजवळ खून झालेल्या महिलेखी अखेर ओळख पटली आहे. मलकापूर येथील संशयीत पिता-पूत्रांनी सोन्याच्या दागिण्यांसाठी महिलेची हत्या केल्याची बाब प्रथमदर्शनी उघड झाली असून मुक्ताईनगर पोलिसांनी दोघा आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
मलकापूर नगरपरीषदेमधील सेवानिवृत्त कर्मचारी महिला प्रभा माधव फाळके (63, रा.गणपती नगर) असे मयत महिलेचे नाव आहे. प्रभा फाळके यांची अतिशय क्रुरपणे हत्या केल्यानंतर त्यांचा मृतदेह हा जाड प्लास्टीकच्या कॅरीबॅगमध्ये भरून मुक्ताईनगर ते बर्हाणपूर महामार्गावर संत मुक्ताबाई साखर कारखान्याच्या पुढे कुंड गावाजवळ असणार्या पुलाच्या खालील बाजूस 29 ऑगस्ट रोजी फेकण्यात आला होता. प्रभा माधव फाळके या 27 ऑगस्ट रोजी परीसरातच असलेल्या मंदिरामध्ये पुजेची थैली घेवून दर्शनासाठी जात असल्याचे मुलाला व सुनेला सांगून घरून निघून गेल्या होत्या परंतु त्यानंतर त्या घरी परतल्याच नाही.
पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी मलकापूर पोलीस निरीक्षकांना मयत महिलेचे फोटो पाठवले होते. त्यांनी ते फोटो परीसरात सोशल मीडियात टाकत ओळख पटविण्याचे आवाहन केले होते. तत्पूर्वी प्रभा फाळके ह्या घरून निघून गेल्याची तक्रार त्यांचा मुलगा रीतेश माधव फाळके याने मलकापूर शहर पोलिसात केली होती व त्यास हे फोटो दाखविण्यात आले त्याने मयत महिला आई असल्याचे पोलिसांना सांगितले. यानंतर मुक्ताईनगर पोलिसांशी संपर्क साधण्यात आला.
फाळके यांच्या घराशेजारी राहणार्या विश्वास भास्कर गाढे (50) आणि भार्गव विश्वास गाढे (21, रा.गणपती नगर, मलकापूर) या दोघा बापलेकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. प्रभा शेळके यांच्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांसाठी बापलेकांनी त्यांच्या राहत्या घरात प्रभा फाळके यांचा निर्घुण खुन करुन त्यांच्या गळ्यातील पोथ, गोफ, अंगठी असा दोन लाखांचा मुद्देमाल काढून घेत फाळके यांचा मृतदेह जाड प्लॉस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये भरुन दोघा बाप-लेकांनी मोटारसायकल वरुन घोडसगांव (चिखली) मार्गे बर्हाणपुर रोडवरील कुंड गावानजीक पुर्णा नदीवरील पुलाखाली फेकून दिल्याची माहिती आरोपींनी कबुली जवाबात दिली आहे.
प्रभा फालके यांचे गाढे परीवारासोबत कौटुंबिक संबंध होते. अगदी प्रभा फाळके या दिवसभर गाढे यांच्याच घरी राहायच्या जेवणही तिथेच करायच्या. त्यातच प्रभा फाळके यांना शेवटचा फोन भार्गव गाढे याने केला होता. त्यानुसार त्यांनी भार्गवच्या फोनची माहिती काढली तर तो घटनेच्या दिवशी मृतदेह आढळला त्या परीसरात असल्याचे दिसून येत होते. त्यामुळे निरीक्षक शेळके यांनी मलकापूर ते घोडसगावमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात पिता-पूत्र दुचाकीवरून मृतदेह घेऊन जाताना स्पष्ट दिसून आले. परंतु एवढे असूनही मारेकरी खुनाची कबुली देत होते. त्यामुळे खुनाचा उद्देश लक्षात येत नव्हता.
निरीक्षक शंकर शेळके यांनी भार्गव गाढेचा मोबाईलचा सीडीआर पुन्हा एकदा तपासला. त्यात त्यांना मुथुट गोल्ड फायनान्सचे काही मॅसेज दिसले. मुथुट गोल्ड फायनान्सचे ऑफिस गाठले आणि 27, 28 तारखेला कुणी-कुणी सोनं गहाण ठेवून पैसे घेतले त्याची यादी मागितली. यादी सामोर येताच भार्गवने सोनं गहाण ठेवत एक लाख 90 हजार रुपये कर्ज घेतल्याची बाब समोर आली. सोन्याचे फोटो काढून प्रभा फाळके यांच्या मुलाले दाखवले असता, त्याने दागिने आपल्या आईचे असल्याचे ओळखले. यानंतर निरीक्षक शेळके यांनी क्षणाचाही विलंब न करता, भार्गवला ताब्यात घेतले.
सर्व पुरावे समोर ठेवूनही भार्गव खुनाची कबुली देत नव्हता. शेवटी खाक्या दाखवताच त्याने सर्व हकीगत सांगितली. वडिलांना दारूचे व्यसन आहे. तसेच माझ्यावरही पन्नास हजाराचे कर्ज होते. तशात वडिलांनी दारूच्या नशेत 27 तारखेला प्रभा फाळके यांच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून ठार करत अंगावरचे सोने काढून घेतले. त्यानंतर मृतदेहाचे गासोडे बांधत फेकून दिले.