---Advertisement---
गुन्हे चोपडा

सत्रासेन गावाजवळ गावठी पिस्तूलासह दोघं ताब्यात

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ नोव्हेंबर २०२२ । चोपडा तालुक्यातील सत्रासेन गावाजवळ चारचाकीत शस्त्र खरेदी विक्री करताना दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

crime 26 jpg webp

तालुक्यातील सत्रासेन गावाजवळील फाट्याजवळ एम.एच.१९.१४३० क्रमाकांची चारचाकी गाडीत विना परवाना शस्त्र खरेदी करून विक्री करण्याच्या उद्देशाने येत होती. त्याच वेळी यातील दोन संशयित आरोपी छगन किसन कोळी (वय ७२) व ज्ञानेश्वर मोहन शिरसाठ नामक व्यक्ती या दोघांच्या ताब्यातून २५ हजार रुपये किमतीची गावठी बनावतीचा स्टीलचा पिस्टल रिकामे व ३ लाख रुपये किमत असलेली चारचाकी गाडी पोलिसांनी ताब्यात घेवून चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकॉ.शिवाजी बाविस्कर हे करीत आहेत.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---