---Advertisement---
अमळनेर जळगाव जिल्हा राजकारण विशेष

भाजप खासदार उन्मेष पाटील यांना राष्ट्रवादीची ऑफर? वाचा सविस्तर

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज | ६ मे २०२३ | सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. त्याचे पडसाद जळगाव जिल्ह्यात देखील उमटतांना दिसत आहे. अमळनेर येथील मंगळग्रह मंदिराच्या विविध विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्यात भाजपाचे खासदार उन्मेष पाटील (MP Unmesh Patil) व राष्ट्रवादीचे आमदार अनिल भाईदास पाटील (MLA Anil Patil) यांच्यांत चांगलीच राजकीय जुगलबंदी रंगली.

unmesh patil jpg webp webp

अमनेर मंगळग्रह मंदिर येथे हेलीपॅडच्या जागेचे भूमिपूजन, यासह सोलर पॅनल असलेले कार पार्किंग यासह विविध कार्यक्रमाचे भाजपचे खासदार उन्मेष पाटील तसेच अमळनेर तालुक्याचे राष्ट्रवादीचे आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना आमदार आणि खासदार यांनी दोघांमध्ये रंगलेली राजकीय जुगलबंदी जिल्हाभरात चर्चेचा विषय ठरली आहे.

---Advertisement---

राष्ट्रवादीचे पक्षाच्या घड्याळाचे काटे सध्या ठिकाणावर नाहीत, हे काटे ठिकाणावर राहावेत, म्हणून राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी मंगळग्रह मंदिराला साकडं घालावं, असा सल्ला खासदार उन्मेष पाटील यांनी दिला. तर आमदार अनिल पाटील यांनी बोलताना खासदार उन्मेष पाटील हे वेळेवर चालतील, घड्याळावर चालतील तर पुन्हा खासदार होऊ शकतील, असा टोला लगावला.

भारतातील मोसमी पावसाचा अंदाज जारी

कार्यक्रमानंतर आमदार अनिल पाटील म्हणाले की, आगामी काळात खासदार उन्मेष पाटील यांच्यावर भाजपमध्ये अन्याय होण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यांनी घड्याळावर चालावं. असं म्हणत आमदार पाटील यांनी एकप्रकारे खासदार उन्मेष पाटील यांना राष्ट्रवादीत येण्याचं आवाहन केलं. राष्ट्रवादीत आले तर ते पुन्हा खासदार होऊ शकतात, असं सुद्धा आमदार अनिल पाटील यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादी आमदार अनिल पाटील यांना खासदार उन्मेष पाटील यांनी प्रत्युत्तर देत म्हटलं आहे की, आमचा पक्ष सक्षम आहे, त्यामुळे मला कुठेही जाण्याची गरज नाही, राष्ट्रवादीचे पक्षाच्या घड्याळाचे काटे सध्या ठिकाणावर नाहीत, हे काटे ठिकाणावर राहावेत, म्हणून राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी मंगळग्रह मंदिराला साकडं घालावं, असा टोला त्यांनी लगावला.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---