जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑगस्ट २०२१ । कोरोनाने सर्वसामान्य त्रस्त असतांना केंद्र सरकारने गॅससह पेट्रोल-डीझेल, खाद्य तेल आदींची दरवाढ केली आहे. वाढत्या महागाईविरोधात आज जळगावमधील टॉवर चौकात राष्ट्रवादी काँग्रेस महिलाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
गॅस सिलेंडरला हार चढवून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी गॅस दर वाढ विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मोदी सरकारने अच्छे दिनाचे स्वप्न दाखविले होते. मात्र, अच्छे दिन न येत महागाईत वाढ झाली असल्याचा आरोप महिला आघाडी महानगरध्यक्षा मंगला पाटील यांनी केला. गॅससह पेट्रोल-डीझेल, खाद्य तेल आदींची दरवाढ मागे घेतली नाही तर नागरिक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असे त्यांनी पुढे सांगितले.
यानंतर टाॅवर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत रॅली काढण्यात आली. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, युवती अध्यक्ष कल्पिता पाटील, वाय. एस . महाजन, सलीम इनामदार, उपाध्यक्ष वाल्मिक पाटील, विलास पाटील, राजू मोरे, आदी उपस्थित होते.