जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑगस्ट २०२२ । गेल्या दोन महिन्यात राज्यात मोठा भूकंप पाहायला मिळाला होता. तो म्हणजे शिंदे गटाने केलेल्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळली होती. त्यांच्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आलं. यानंतर राज्यातील राजकीय वाद काही प्रमाणात उफाळून आल्याचे दिसून येते. कल्याणमधील एका जीममध्ये सॉलिड राडा झाला. राड्यामागचं कारणही राजकीय वाद होतं. थेट जिममध्येच राष्ट्रवादी आणि भाजपाचे कार्यकर्ते भिडलेत. ही घटना सीसीटीव्हीमध्ये देखील कैद झालीये.
कल्याण डोंबिवलीच्या ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून राजकीय वाद अनेकदा विकोपाला गेल्याचं पाहायला मिळालंय. त्यातच कल्याण ग्रामीण मधला संदप भोपर हा पट्टा कायमच वादग्रस्त चर्चेत असतो. आता पुन्हा या ठिकाणी एक नवीन वाद समोर आला. आज सकाळी राष्ट्रवादीचे ब्रह्मा माळी हे जिममध्ये होते. यावेळी भाजपाचे पदाधिकारी कुंदन माळी हे आपल्या कार्यकर्त्यांसह जिममध्ये आले.
जुन्या राजकीय वादातून कुंदन आणि ब्रह्मा यांच्यामध्ये वाद झाला. भांडण वाढलं. शब्दाला शब्द वाढत गेला, हमरीतुमरी झाली. अखेर वादाचा स्वरूप हाणामारीत झाले. तिघे जण मिळून एकाला मारहाण करताना व्हिडीओत दिसून आले आहेत. तर एक व्यक्ती या भांडणात मध्ये पडून मारहाण करणाऱ्यांना अडवताना दिसतोय. अखेर तिघेही मारहाण करणारे निघून जातानाही दिसतात.