⁠ 
मंगळवार, ऑक्टोबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | राष्ट्रवादीतर्फे आज जळगावात धरणे आंदोलन

राष्ट्रवादीतर्फे आज जळगावात धरणे आंदोलन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मे २०२१ । आधीच सततच्या पेट्रोल डीझेल भाव वाढीने महागाईची झळ बसत असताना आता केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या किंमती वाढवल्या आहे. याच पार्श्वभूमीवर आज दुपारी १२ वाजेला जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात राष्ट्रवादी कॉंग्रेस तर्फे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

कोरोना काळात लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांना जगणे अवघड झाले आहे. त्यात सतत वाढत असलेल्या इंधन दर वाढीने बजेट कोलमडले आहे. पेट्रोलचे दर १०० रूपयांवर पाेहचले असताना रासायनिक खतांच्या किंमती ७०० रूपयांपर्यत वाढवण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने एन कोरोना काळात जनतेला दिलेल्या या शाॅकमुळे जनता त्रस्त आहे. शेतकऱ्यांना यंदा खरीपाची पेरणी करणेही अवघड झाले आहे. या दरवाढ, महागाई विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे सोमवारी दुपारी १२ वाजता आकाशवाणी चौकात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

पेट्राेल, डिझेल व गॅसच्या दरवाढीमुळे जनता त्रस्त असताना एेन पेरणीच्या तोंडावर केंद्राने रासायनिक खतांचे दर वाढवले आहे. खतांच्या एका बॅगमागे ७०० रूपयांची वाढ केल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. एकीकडे खतांची एक बॅग २ हजार रूपयांना विक्री करून शेतकऱ्यांच्या खात्यावर २ हजारांचे तोडके अनुदान टाकण्याचे इव्हेंट केंद्र सरकार साजरे करत आहे. या केंद्र सरकराचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस महानगरतर्फे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वात सोमवारी आंदोलन करण्यात येणार असल्याचे पक्षातर्फे कळविण्यात आले आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.