⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

Indian Navy : नौदलात अग्निवीरांच्या तब्बल 2800 पदांसाठी भरती, 12वी पास असाल तर असा करा अर्ज?

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । भारतीय नौदलाने अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीर SSR पदांसाठी अर्ज मागवले आहेत. ज्यासाठी उमेदवार 15 जुलै 2022 पासून अर्ज सादर करू शकतील. या भरतीद्वारे एकूण २८ पदे भरण्यात येणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या पदांसाठी अर्ज सादर करू शकतील. Navy Agnipath Recruitment 2022

भारतीय नौदलाचा SSR अभ्यासक्रम नोव्हेंबर महिन्यात सुरू होणार आहे. त्याच वेळी, उमेदवारांना ऑक्टोबर महिन्यात लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणीसाठी बोलावले जाईल.

शैक्षणिक पात्रता Indian Navy Recruitment
गणित, भौतिकशास्त्र या विषयांसह १२वी उत्तीर्ण उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.

वय श्रेणी
अर्जदाराची जन्मतारीख 1 नोव्हेंबर 1999 ते 30 एप्रिल 2005 दरम्यान असावी.

शारीरिक तंदुरुस्ती
उमेदवाराची किमान उंची 157 सेमी असावी. तपशीलवार शारीरिक पात्रता अधिसूचना उपलब्ध आहे.

निवड प्रक्रिया
लेखी चाचणी, शारीरिक चाचणी आणि वैद्यकीय चाचणीद्वारे या पदांवर उमेदवारांची निवड केली जाईल.

अर्ज कसा करायचा
joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
आता लॉगिन करा आणि ‘वर्तमान संधी’ वर क्लिक करा.
अर्जावर क्लिक करून फॉर्म भरा आणि सबमिट वर क्लिक करा.
आता अर्जाची प्रिंट आउट घ्या आणि भविष्यातील संदर्भासाठी ठेवा.

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online   [Starting 15 जुलै 2022]