⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

Navratri Garba : नवरात्री उत्सवात ‘गरबा’चे का आहे विशेष महत्व?

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ सप्टेंबर २०२२ । नवरात्रीचा उत्सव आजपासून संपूर्ण जगामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. नवरात्र मध्ये नऊ दिवस मनोभावे आई अंबेची पूजा केली जाते. हिंदू धर्मात या नवरात्री सणाला खूप महत्त्व आहे. म्हणूनच की काय तर हिंदू धर्मातले कित्येक लोक नवरात्रीमध्ये नऊ दिवस कडक उपासही करतात. मात्र या काळात गरब्याला फार महत्त्व असते. नवरात्री उत्सवात गरबाचे विशेष महत्व का आहे ? काय आहे कारण? जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर

सध्याच्या काळात गरब्याला स्पर्धेच्या दृष्टितीने जरी पहिले जात असेल तरी देवीच्या दरबारात गरबा खेळण्याला एक धार्मिक महत्त्व आहे. हिंदू पुराणानुसार अंबा मातेने महिषासुराचा वध केला होता. महिषासुराच्या अत्याचारापासून मानवाची मुक्ती मातेने केली होती. हा विजय मिळाल्यावर लोकांनी हे नृत्य केले. या नृत्याला लोक ‘गरबा’ म्हणत. माँ अंबेला हे नृत्य खूप आवडत होत. यामुळे हे नृत्य करायची परंपरा सुरु झाली. म्हणजेच गरबा करण्याची परंपरा सुरू आहे. यामुळे माता प्रसन्न होते, असे देखील मानले जाते.

पारंपारिक गरब्यावेळी मातीच्या भांड्याभोवती दिवा लावून गरबा केला जातो. या दिव्याला ‘गर्भ दीप’ असं म्हणतात. नर्तक म्हणजेच गरबा खळणारे या मातीच्या भांड्यात किंवा घागरीभोवती वर्तुळात फिरतात आणि गरबा खेळतात. हा हावभाव जीवनाच्या चक्राचे प्रतीक देखील मानला जातो. जो जीवनापासून मृत्यूपर्यंत पुनर्जन्मापर्यंत प्रगती करतो.

मातीचे भांडे किंवा गार्बो हे गर्भाचे प्रतीक आहे. अस म्हणतात कि, अंबा माता (अंबे माँ) ही एक स्त्री आणि जगाची रक्षक आहे. ती आपल्या मुलांचे बाह्य जगाच्या क्रोधापासून संरक्षण करते. आईप्रमाणे आपल्या मुलांसाठी उभी राहते. आतील प्रकाश हे गर्भातील बाळाचे प्रतीक आहे. हा प्रत्येक स्त्रीचा, विशेषतः मातांचा सन्मान आहे. गर्भ देखील जीवन देणारा आहे, जिथे शरीर जन्म घेते आणि आकार घेते. यासाठी नवरात्रीत गरबा खेळण्याला विशेष महत्त्व आहे.