जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जुलै २०२१ । सावदा (प्रतिनिधि) – वडगांव ता.रावेर येथे नेचर हार्ट फाउंडेशन, नेहरू युवा केंद्र जळगाव व ग्रामपंचायत वडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने वडगाव येथील स्मशानभूमी परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
तसेच रावेर तालुक्यातील खालावत चाललेली भूजल पातळी लक्षात घेऊन पावसाचे पाणी जमिनीत मुरावे यासाठी परिसरामध्ये शोष खड्डा तयार करण्यात आला.या वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी वडगाव गावचे सरपंच धनराज पाटील, पोलीस पाटील संजय वाघोदे, ग्रा.प. सदस्य व नेहरू युवा केंद्र, जळगाव चे रावेर तालुका समन्वयक आनंदा वाघोदे, नेचर हार्ट फाउंडेशन चे संचालक मुकेश महाजन, शेख सलमान, चेतन भालेराव, प्रशांत गाढे, विनायक जहुरे, उपस्थित होते.
युवकांना संदेश देतांना नेचर हार्ट फाउंडेशन चे अध्यक्ष अॅड.शिवदास कोचुरे म्हणाले की,वृक्षरोपण हा निव्वळ एक सरकारी उपक्रम न राहता ती एक लोकचळवळ बनावी व संपूर्ण परिसर हिरवळ व्हावा त्याचबरोबर मानवाच्या सुरक्षित भविष्यासाठी वृक्षारोपण व त्यांचे संवर्धन करणे, तसेच भूजल पातळी वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी युवकांच्या सहभागाने व लोक सहकार्याने नेचर हार्ट फाउंडेशन काम करणार असल्याचे सांगितले. तर कार्यक्रमाचे आभार मानते वेळी नेचर हार्ट फाउंडेशन चे संचालक चेतन भालेराव म्हणाले की पर्यावरण संवर्धनासाठी तसेच खालावलेला भूजल पातळीचा धोका लक्षात घेऊन पर्यावरणाची झालेली हानी भरून काढण्यासाठी युवकांनी मोठ्या प्रमाणावर पुढे येणे गरजेचे आहे.
तसेच रोपांचे वृक्ष होईपर्यत वृक्षांचे संवर्धन करण्याची जबाबदारी वडगाव येथील युवक अजय वाघोदे, देवानंद गजरे, सचिन वाघोदे, निलेश वाघोदे, आकाश वानखेडे, अक्षय वाघोदे, प्रशिक वाघोदे, जय वाघोदे, सिद्धार्थ वाघोदे, अनिकेत सुरवाडे, अक्षय वाघोदे, दीपक वाघोदे, सौरव वाघोदे, शौर्य वाघोदे, वीरू वाघोदे, मुरलीधर वाघोदे, मकबुल तडवी, विजय तायडे, पिंटू वाघोदे, किशोर लहासे, तुषार वाघोदे यांनी घेऊन कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले व परिश्रम घेतले.