जळगाव लाईव्ह न्यूज । रावेर प्रतिनिधी । पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरवाढीविरुद्ध केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीतर्फे शनिवारी धरणे आंदोलन करण्यात आले.
केंद्र सरकारने वाढविलेल्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरीकांचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरवाढीविरुद्ध केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी आज रावेर येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयासमोर किसान सेल जिल्हाध्यक्ष सोपानदादा बाबुराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व महिला तालुकाध्यक्ष मायाताई बारी यांच्या नेतृत्वाखाली गॅस सिलेंडरने हजाराचा आकडा गाठला आहे म्हणून “गॅस सिलेंडरचा सत्कार”करून या केंद्र सरकारच्या विरोधात निषेध नोंदवला व धरणे आंदोलन आणि तहसीलदार सि.जी.पवार यांना निवेदन देण्यात आले.यावेळी केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
यावेळेस किसानसेल जिल्हाध्यक्ष सोपान पाटील,जिल्हा उपाध्यक्ष गोटू शेठ, तालुकाध्यक्ष नीलकंठ चौधरी,शहराध्यक्ष मेहबूब शेख,कार्याध्यक्ष विलास ताठे, युवक शहराध्यक्ष प्रणीत महाजन,शहरकार्याध्यक्ष मयूर,महिला तालुकाधक्ष्या मायाताई बारी,महिला शहराध्यक्ष्या कुसुमताई मोरे,उपाध्यक्ष्या सुनंदा बिऱ्हाडे,उपाध्यक्ष्या इंदुताई हिवरे,सरचिटणीस कमला पंत,यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.