---Advertisement---
जळगाव जिल्हा कृषी महाराष्ट्र राजकारण

राष्ट्रवादीतर्फे राज्य सरकारचा जागरण-गोंधळ घालत निषेध

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जून २०२३ । जळगाव जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पार्टी युवक जिल्हाध्यक्ष रविंद्र नाना पाटील यांच्यातर्फे कापसाला भाव मिळावा यासाठी आमरण उपोषण करण्यात येत आहे. उपोशणाच्या दुसर्‍या दिवशी अनोख्या प्रकारे राज्य सरकारचा निषेध करण्यात आला.

rashtravadi andolan jpg webp webp

बुधवार पासुन रवींद्र नाना पाटील यांनी कापसाच्या भावासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. गुरुवारी उपोषणाच्या ठिकाणी जागरण-गोंधळ सादर करण्यात आला. यावेळी शेतकरी बांधव,सामान्य नागरिक, पक्षाचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच अन्य पक्षाचे समर्थक व पदाधिकारीही उपस्थित होते. आज प्रारंभ राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र नाना पाटील व त्यांच्या सौभाग्यवती अश्विनी पाटील यांनी पूजन करून गोंधळास प्रारंभ झाला. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदिप दादा पवार यांनी जळगांव जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने जाहिर पाठिंबा दिला.

---Advertisement---

याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा संघटक सचिव प्रा डॉ सुनिल नेवे सर, राष्ट्रवादी युवकचे जिल्हा कार्याध्यक्ष दिपक पाटील, रावेर बाजार समितीचे सभापती सचिन रमेश पाटील, जळगाव बाजार समितीचे उपसभापती राजेंद्र पाटील, भुसावळ तालुकाध्यक्ष अतुल चव्हाण,संचालक अरूण पाटील,गट प्रमुख लक्ष्मण सपकाळे, युवकचे जिल्हा सरचिटणीस श्रीकांत चौधरी, चेतन पाटील, जिवन बोरनारे , राष्ट्रवादी युवकचे यावल तालुकाध्यक्ष देवकांत पाटील,विनोद पाटील, किशोर माळी, नरेंद्र शिंदे, भुसावळ युवक शहराध्यक्ष रणजित चावरिया, कार्याध्यक्ष विशाल ठोके,सिद्धार्थ सपकाळे, विजय भंगाळे, मिलींद उंबरकर,आदी मंडळी उपस्थित होती.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---