⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | रायसोनी महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

रायसोनी महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २ मार्च २०२२ । रायसोनी महाविद्यालयाच्या अभियांत्रिकी प्रथम वर्ष विभागात राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून नानाविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व किरण मशीन टूल्सचे व्यवस्थापक दिपक सरोदे व एचआर दिनेश भंगाळे यांनी विज्ञान संदर्भातील विविध विषयावर मार्गदर्शन केले.

यावेळी विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली. तसेच विज्ञान दिनानिमित्त विद्यार्थ्यांना अन्न भेसळ चाचणी प्रात्यक्षिके सादरीकरण करून दाखवण्यात आले. व पोस्टर प्रेझेंटेशन, टेक्नीकल पोस्टर, लोगो डिझाईन, कव्हर पेज डिझाईन या विविध स्पर्धेचे आयोजनहि यावेळी करण्यात आले. कार्यक्रमासाठी रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा, विभागप्रमुख जितेंद्र वडदकर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्वाती बाविस्कर यांनी केले. तर प्रा. प्रिया टेकवाणी, प्रा. कल्याणी पाठक, प्रा.मुकेशकुमार पाल, अय्याज शेख, अविनाश खंबायत व नाझीर अहमद यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इंस्टीट्यूटचे संचालक प्रीतम रायसोनी यांनी कौतुक केले.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह