---Advertisement---
महाराष्ट्र राजकारण

तर खुद्द नरेंद्र मोदी अडचणीत येतील ! – संजय राऊत

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मे २०२३ । नुकताच शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवण्यास सर्वोच न्यायालयाने नकार दिला. आणि त्याबाबत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा, असे आदेश दिले. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलासा मिळाला. मात्र आता खासदार संजय राऊत यांनी सरकारला जावेच लागेल, असं म्हटलं आहे.

sanjay raut 1 jpg webp

“सर्वोच्च न्यायालयाचा लढा, जवळजवळ अंतिम टप्प्यात आला आहे. सरकारचे तीन महिने बाकी आहेत. या सरकारला जावच लागेल. घटनाबाह्य सरकार वाचवण्याचं कोणी कितीही प्रयत्न केले, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी अडचणीत येतील. पंतप्रधान बेकायदेशीर काम करतात का? त्यांच्या डोळ्यांसमोर बेकायदेशीर कृत्य घडत आहे,” असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला आहे.

---Advertisement---

यावेळी ते म्हणाले कि, “सर्वोच्च न्यायालयाने निवाडा दिला आहे. पंतप्रधान हे डोळं उघडे ठेऊन बघत बसले, तर जगाला काय तोंड देणार? लोकशाही, घटनेचे संरक्षणकर्ते म्हणून जगात कोणत्या तोंडाने फिरणार?

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---