गुन्हेजळगाव जिल्हा
फैजपूर पोलीस ठाण्यातील नाईक एसीबीच्या जाळ्यात
जळगाव लाईव्ह न्यूज । ३ सप्टेंबर २०२१ । दारू व्यावसायीकास नियमित धंदा करू देण्यासाठी महिन्याला पाचशे रुपयांची लाच मागणार्या फैजपूर पोलीस ठाण्यातील गोपनीय विभागातील नाईक पोलीस नाईक अनिल महाजन यांना एसीबीच्या पथकाने शुक्रवारी दुपारी दोन वाजता लाच स्वीकारताच अटक केल्याने पोलीस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव व सहकार्यांनी हा सापळा यशस्वी केला.