जळगावमार्गे एलटीटी-नागपूर साप्ताहिक रेल्वे सुरू ; वाचा वेळापत्रक आणि थांबे..

ऑगस्ट 25, 2025 10:20 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव मार्गे मुंबई जाण्यासाठी नवीन विशेष गाडी सुरु झालीय. मध्ये रेल्वेनं एलटीटी ते नागपूर दरम्यान अतिरिक्त विशेष गाडीच्या सहा फेऱ्या करण्यात येतील. या गाडीला भुसावळ आणि जळगाव स्थानकांवर थांबा असणार आहे. यामुळे मुंबईत श्रींच्या दर्शनासाठी जाणाऱ्या जिल्ह्यातील भाविकांची सोय होईल.

train

०२१०९ क्रमांकाची गाडी २२ ऑगस्ट ते ५ सप्टेंबरपर्यंत दर शुक्रवारी मध्यरात्री १२.१५ वाजता एलटीटी येथून सुटेल. ही गाडी जळगाव स्थानकावर सकाळी ६ वाजून २६ मिनिटांनी तर भुसावळला ६ वाजून ५५ मिनिटांनी पोहोचेल. नंतर नागपूर येथे दुपारी १.४० वाजता पोहोचेल. या गाडीच्या तीन फेऱ्या होतील.

तर ०२१०२ क्रमांकाची विशेष गाडी २२ ऑगस्ट ते ५ सप्टेंबरपर्यंत दर शुक्रवारी दुपारी अडीच वाजता नागपूर येथून सुटेल. त्यांनतर ती भुसावळला रात्री ९ वाजून ४० मिनिटांनी तर जळगाव स्थानकावर रात्री १० वाजून १५ मिनिटांनी पोहोचेल. तसेच एलटीटीला सकाळी ५ वाजेला पोहोचेल. या गाडीच्या सुद्धा तीन फेऱ्या होतील. या गाडीला ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ स्थानकावर थांबा आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now