गोवा गाठणं झालं सोपं! भुसावळमार्गे धावणारी विशेष रेल्वे गाडी नियमित, वेळापत्रक अन् थांबे तपासून घ्या..

मे 15, 2026 2:27 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नागपूर ते मडगाव (गोवा) दरम्यान प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. रेल्वे प्रशासनाने या मार्गावर धावणाऱ्या विशेष रेल्वे गाडीचे आता नियमित सेवेत रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष या गाडीला भुसावळ स्टेशनवर थांबा असल्याने गोव्याला जाणाऱ्या जिल्ह्यातील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

train

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ११२०३ नागपूर–मडगाव द्वि-साप्ताहिक एक्सप्रेस उद्या १६ मेपासून प्रत्येक बुधवारी आणि शनिवारी नागपूर स्थानकावरून दुपारी ०३.०५ मिनिटांनी सुटेल. त्याच दिवशी रात्री ९.२५ वाजता भुसावळ स्टेशनवर पोहोचेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी ०५.४५ मिनिटांनी मडगाव येथे पोहोचेल. त्याचप्रमाणे गाडी क्रमांक ११२०४ मडगाव–नागपूर द्वि-साप्ताहिक एक्सप्रेस १७ मेपासून प्रत्येक गुरुवारी आणि रविवारी मडगाव स्थानकावरून सुरू होणार आहे. ही गाडी रात्री ८ वाजता मडगावहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी २.१० वाजता भुसावळला पोहोचेल. यानंतर रात्री ०९.२५ वाजता नागपूर येथे पोहोचेल.

या विशेष स्थानकांवर असेल थांबा?

या गाडीला मार्गात वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम आणि करमाली या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला एकूण २४ कोच असून, यामध्ये जनरल, स्लीपर आणि एसी अशा सर्व प्रकारचे कोच आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now