जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जुन २०२३ । मुक्ताईनगरमध्ये रस्त्याच्या बाजूला एका तरूणाचा मृतदेह छिन्नविच्छीन्न अवस्थेत आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शहराजवळच असलेल्या मुक्ताई मंदिराच्या मागच्या परीसरात हा मृतदेह आढळला आहे.
मुक्ताईनगर शहराजवळच्या संत मुक्ताई मंदिराच्या मागील बाजूस आज सकाळी एका तरूणाचा मृतदेह आढळून आला .या तरूणाच्या शरीरावर तीक्ष्ण हत्यार तसेच दगड वा तत्सम वस्तूने वार केल्याचे दिसून येत आहे.
पोलिसांना याची माहिती मिळताच सहायक पोलीस निरिक्षक संदीप दुनगहू यांनी आपल्या सहकार्यांसह घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. या तरूणाची ओळख पटविण्याचे काम देखील सुरू करण्यात आले आहे