---Advertisement---
गुन्हे भडगाव

Murder : २८ वर्षीय तरुणाचा शेतात आढळला मृतदेह, खून झाल्याचा संशय!

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑगस्ट २०२२ । भादली येथील २८ वर्षीय तरुणाचा मृतदेह कडगाव रस्त्यावरील पाटचारीजवळ असलेल्या शेतात आज बुधवारी सकाळी आढळला. दरम्यान, या घटनेने परीसरात खळबळ उडाली आहे.

crime 2022 06 20T155553.090 jpg webp

संकेत लिलाधर आढाळे (वय २८) असे मयत तरुणाचे नाव आहे. संकेत आढाळे या तरुणाचा कडगाव रस्त्यावर पाटचारीजवळ लागून असलेल्या शेतात मृतदेह आढळला आहे. तरुणाच्या डोक्यावर ईजा झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, तरुणाचा खून झाल्याचा प्राथमिक संशय आहे. मात्र, शवविच्छेदन अहवालातून तरुणाच्या मृत्यूचे स्पष्ट कारण समोर येणार आहे.

---Advertisement---

तरुणाचा मृतदेह शेतात असल्याची माहिती कळताच नशिराबादचे सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे, एएसआय अलियार खान, समाधान पाटील, किरण बाविस्कर, संजय बाळू पाटील आदींनी धाव घेतली.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---