⁠ 
रविवार, जुलै 14, 2024

पाचोरा तालुक्यात तरुणाचा खून ; परिसरात खळबळ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२४ । पाचोरा तालुक्यातील सातगाव तांडा येथून खुनाची घटना समोर आलीय. जुन्या भांडणाच्या कारणावरून तरुणाच्या डोक्यात लोखंडी कड्याने वार केल्याने गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोपट ओमकार राठोड वय २२ रा. असं मयत तरुणाचे नाव असून याबाबत पिंपळगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

सातगाव तांडा येथे पोपट ओमकार राठोड हा परिवारासह वास्तव्याला होता. रविवार १० मार्च रोजी सायंकाळी ७.३० वाजता जुन्या भांडणाच्या कारणावरून गावात राहणारा राहुल अभिमान अल्हाड वय-२५ याने गावातील बसस्थानक जवळ शिवीगाळ करत बेदम मारहाण केली तसेच हातातील लोखंडी कड्याने डोक्यावर मारहाण केली आणि जमिनीवर डोके आपटल्याने जागीच मृत्यू झाला.

ही घटना घडल्यानंतर गावात खळबळ उडाली. दरम्यान याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी राहुल अभिमान अल्हाड यांच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्य पोलीस निरीक्षक प्रकाश काळे हे करीत आहे.