---Advertisement---
गुन्हे पाचोरा

पाचोऱ्यात क्षुल्लक कारणावरून तरुणाचा खून, ५ संशयीत ताब्यात

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ जानेवारी २०२२ । शहरातील गुन्हेगारीने तोंडवर काढले असून शहरातील पुनगाव रोड स्थित बुऱ्हाणी शाळेसमोरील मोकळ्या जागेत रविवारी संध्याकाळी दुचाकीचा कट लागल्यावरून दोन गटात वाद झाला. वादाचे पर्यवसान हाणामारी होऊन एका तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

pachora youth murder jpg webp

रविवारी बुऱ्हानी शाळेच्या समोरील मोकळ्या जागी ६.४५ वाजेच्या सुमारास तरुणांच्या दोन गटात दुचाकीचा कट लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून वाद झाला. वादाचे पर्यवसान हाणामारीत होऊन लाठ्या काठ्या, चॉपर, फायटरचा वापर करत तुफान राडा झाला. यात शहरातील पुनगाव रोड लगत असलेल्या दुर्गा नगर भागातील २३ वर्षीय युवक भूषण नाना शेवरे याचा खून झाला आहे.

---Advertisement---

सनी रवींद्र देवकर वय २३ रा.गाडगेबाबा नगर याच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिसात सकाळी ३ वाजता खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी तात्काळ पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान अनेक वर्षांनंतर पाचोऱ्यात खुनाचा गुन्हा घडल्याने खळबळ उडाली असून शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या गुंडगिरीला चाप लावण्याचे आव्हान पोलिसांपुढे उभे ठाकले आहे.

या प्रकरणी पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेत सनी देवकर आणि रोशन साळुंखे हे जखमी झाले आहेत. पोलिसांनी रात्रीच पाच संशयितांना ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील हे करीत आहे.

यांना केली अटक
लोकेश उर्फ विकी शामराव शिंदे, मयुर दिलीम पाटील, राकेश उर्फ सचिन राजेंद्र चौधरी, सागर प्रकाश पाटील, आविनाश उर्फ भद्रा सुरेश पाटील, सर्व रा.पाचोरा आज अटक केली आहे.

हे देखील वाचा :

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---