मंगळवार, नोव्हेंबर 28, 2023

पती-पत्नीतील भांडण विकोपाला! डोक्यात फरशी मारून पत्नीला संपविलं

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जून २०२३ । एरंडोल येथून एक धक्कादायक घटना समोर आलीय. घरगुती भांडणातुन पतीने पत्नीच्या डोक्यात फरशी टाकून खून केल्याची घटना येथील गांधीपुरा भागात आज सोमवारी दुपारी उघडकीस आली. हर्षदा किरण मराठे (वय-२७, गांधी पूरा, वखारीजवळ) असे मयत विवाहितेचे नाव आहे. याबाबत गुन्हा दाखल केला असून संशयित आरोपी पती किरण महादू मराठे (वय-३५) पतीला पोलीसांनी अटक केली आहे.

हर्षदा मराठे या महिला पती किरण महादू मराठे यांच्यासह शहरातील गांधी पुरा भागात वास्तव्याला होत्या. गेल्या काही दिवसांपासून मराठे दाम्प्त्यामुळे कौटुंबिक वाद सुरू होते. सोमवारी १९ जून रोजी दुपारी १ वाजता वाद उफाळून आला. यात सतांपाच्या भरात पती किरण मराठे याने पत्नी हर्षदा मराठे यांच्या डोक्यात घरातील फरशी मारली. यात विवाहिता गंभीर जखमी झाल्या.

अतिरक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एरंडोल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीष गोराडे यांनी धाव घेवून पंचनामा केला. मृतदेह एरंडोल ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आला. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा संशयित आरोपी पती किरण मराठे याला ताब्यात घेतले असून एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.