काँग्रेस नेत्याच्या हत्येने महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ

जानेवारी 7, 2026 1:28 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । राज्यात एकीकडे महानगर पालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना अकोलाच्या आकोट तालुक्यामधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मोहाळा गावी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.या घटनेमुळे संपूर्ण अकोला जिल्ह्यात तणावपूर्ण शांतता पसरली असून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

hidayat patel

कशी घडली घटना?
मिळालेल्या माहितीनुसार, हिदायत पटेल हे मोहाळा गावात असताना एका व्यक्तीने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. आरोपीने चाकूने पटेल यांच्या पोटात आणि मानेवर दोन ते तीन गंभीर वार केले. हल्ल्यानंतर मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने पटेल जागीच कोसळले.या घटनेचा एक थरारक व्हिडिओ देखील समोर आला असून, त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने अकोटवरून अकोला येथील रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही त्यांची प्राणज्योत मालवली.

Advertisements

घटनेची माहिती मिळताच आकोट पोलिसांनी तातडीने हालचाली करून हल्लेखोराला अटक केली आहे. मात्र, या हल्याचे नेमके कारण काय होते? हा हल्ला जुन्या वैमनस्यातून झाला की यामागे काही राजकीय षडयंत्र आहे? याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

Advertisements

काँग्रेसवर शोककळा
हिदायत पटेल यांच्या मृत्यूची बातमी समजताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली. संपूर्ण राजकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. मोहाळा गावात आणि आकोट शहरात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now