---Advertisement---
गुन्हे चोपडा

पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय, मोठ्या भावावर विळ्याने वार करून हत्या ; जळगाव पुन्हा हादरले

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मार्च २०२३ । जळगाव जिल्हा पुन्हा एकदा खुनाच्या घटनेनं हादरला आहे. धक्कादायक म्हणजे लहान भावानेच आपल्या मोठ्या सख्ख्या भावावर विळ्याने वार करून ठार केलं आहे. पत्नीसोबत असलेल्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून हा खून करण्यात आल्याचं फिर्यादीमध्ये म्हटलं आहे.ही घटना चोपडा तालुक्यातील मितावली येथे घडली असून या घटनेनं घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान याप्रकरणी आरोपीस पोलिसांनी अटक केली.

chopda murder jpg webp webp

काय आहे घटना?
चोपडा तालुक्यातील मितावली येथे संदीप प्रताप पाटील आणि सतीश प्रताप पाटील (वय ३६) हे दोन भाऊ वास्तव्याला होते. हे दोन्ही जण आपलील वडिलोपार्जीत शेती करून उदरनिर्वाह करत असत. दरम्यान, हे दोन्ही भाऊ आपल्या पारगाव शिवारात काम करण्यासाठी सोबत गेले होते दरम्यान दोघं भावांमध्ये जोरदार वाद झाल्याची माहिती मिळतं आहे.

---Advertisement---

या वादात सतीश याने आपला सख्खा मोठा भाऊ संदीप याच्यावर विळ्याने वार केले. यात संदीप यांचा जागीच मृत्यू झाला. वार्‍यासारखी ही बातमी पसरल्याने ग्रामस्थही घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, घटनास्थळी विभागीय पोलीस अधिकारी ऋषीकेश रावले, एपीआय गणेश बुवा पी.एस.आय.चंद्रकात पाटील यांनी आपल्या सहकार्‍यांसह भेट देऊन तपास सुरू केला.

दरम्यान, आरोपीने पत्नीशी मोठया भावाचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून सख्खा भाऊ असलेल्या संदीपच्या पोटाचे डावे बाजुस विळ्याने भोसरुन जखमी करुन रुमालाने गळा आवळुन त्याचा खुन केला आहे. या दोन्ही भावांमध्ये नेमका कशावरून वाद झाला याची माहिती समजली नाही. या प्रकरणी सतीश पाटील याला ताब्यात घेण्यात आले आहे. सदर प्रकरणी अडावद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात असून पुढील तपास सुरु आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---