---Advertisement---
गुन्हे चाळीसगाव

‘या’ कारणामुळे मोठ्या भावाने धाकट्या भावाचा केला खून.. चाळीसगाव तालुका हादरला

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑगस्ट २०२२ । एकीकडे बैल पोळा सण उत्साह साजरा होत असताना दुसरीकडे अवघ्या चाळीसगाव तालुक्याला हादरवणारी घटना घडली. दारूच्या नशेत असलेल्या मोठ्या भावाने लहान भावाच्या डोक्यात बैल पूजनाची लोखंडी पास डोक्यात घालून खून केल्याची धक्कादायक घटना अभोणे येथे घडली. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनला रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

murder raver

अभोणे येथे मोठा भाऊ पिंटू तुकाराम पाटील (३८) व लहानभाऊ शिवाजी तुकाराम पाटील (३२) हे घरी बैल पूजनासाठी आले होते. लहान भाऊ शिवाजी पाटील याने दारूच्या नशेत शिवीगाळ करायला सुरुवात केली. एवढेच नव्हे तर, लहानभाऊ शिवाजी पाटील याने मोठ्या भावाच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह इच्छा व्यक्त केली. त्यामुळे दोघांमध्ये मोठा वाद झाला. यानंतर वादाचे परिवर्तन हाणामारीत झाले.

---Advertisement---

दारापुढे बैल पूजनाची तयारी सुरू असताना हा वाद सुरू होता. जवळच बैल पूजनासाठी लोखंडी पास ठेवण्यात आली होती. मोठा भाऊ पिंटू तीच पास घेऊन लहान भाऊ शिवाजी यांच्या डोक्यावर तीन वार केले. डोक्यावर जोरदार प्रहार झाल्यामुळे लहान भाऊ शिवाजी जागीच गतप्राण झाले. त्याला तात्काळ चाळीसगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी तपासून त्याला मयत घोषित केले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---