⁠ 
गुरूवार, ऑक्टोबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | आजपासून अट्रावल येथील मुंजोबा यात्रेला सुरुवात ; असे आहेत यात्रेचे वार

आजपासून अट्रावल येथील मुंजोबा यात्रेला सुरुवात ; असे आहेत यात्रेचे वार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० फेब्रुवारी २०२४ । यावल तालुक्यातील अट्रावल येथील जागृत देवस्थान मुंजोबा यांच्या यात्रेला शनिवार (दि.१०) पासून सुरुवात होत आहे. महिनाभर चालणाऱ्या या यात्रोत्सवात शनिवार, सोमवार असे लागोपाठ पाच वारमध्ये यात्रा साजरी केली जाते. या देवस्थानावर खान्देशवासीयांसह राज्य-परराज्यातील भाविकांची मोठी श्रद्धा आहे. भाविक देवस्थानावर नवस मानत मनोकामना पूर्ण करण्यासाठी येत असतात. दरम्यान, दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी यात्रेची परिपूर्ण तयारी झाली असून यात्रेस्थळी व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत. यात्रेच्या दिवशी येथील यावलच्या एसटी आगारासह भुसावळ ,फैजपूर, रावेर, जळगाव येथून बसेस सोडल्या जातात.

अनेक वर्षापासून असलेल्या अट्रावल-भालोद येथील जीर्ण वडाच्या वृक्षाखाली मुंजोबा देवस्थान आहे. या यात्रोत्सवास आज १० फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. आज यात्रेचा पहिला वार असून, सोमवार (दि.१२) रोजी दुसरा, शनिवार (दि.१७) तिसरा तर सोमवार (दि.१९) चौथा आणि शनिवार (दि.२४) माध पौर्णिमेच्या दिवशी शेवटचा वार राहणार आहे.

मनोरंजनाची साधने उपलब्ध
यात्रेचे निमित्त जिल्ह्यासह मध्यप्रदेशातील बर्‍हाणपूर, खंडवा व इतरत्र ठिकाणाहून खेळणी, पाळणे, सर्कस इतरत्र खेळ याठिकाणी मोठ्या प्रमाणात पहावयास मिळतात. दर्शनाबरोबरच मनोरंजनाची साधनेही मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. तसेच मोठ-मोठे विविध स्टॉल येथे सजवून लावलेले असतात.

अग्नीडाग पहावयास मिळतो
या ठिकाणी तीन देवस्थान आहेत. यात पहिले संतोषी मातेचे, मनुदेवीचे व मुंजोबा असे मंदिर आहेत. तसेच पोलीस यंत्रणा देखील सतर्क असल्याने चोख बंदोबस्त ठेवण्यात येतो. यात्रा झाल्यानंतर येथे असल्याने याठिकाणी अग्निडाग पहावयास मिळतो. त्याचप्रमाणे आजू-बाजूच्या खेड्यागावातून याठिकाणी लोक वर्गणी जमा करुन महाप्रसादाचा कार्यक्रम पार पाडला जातो. या प्रसादाचा लाभ परिसरातील भाविक मोठ्या आनंदाने घेत असतात.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.