लाईव्ह न्यूज । २५ मार्च २०२१ । शहरासह जिल्ह्यात कोरोना मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासन आता घरोघरी जावून कोरोना रुग्णांचा शोध घेण्याची मोहिम सुरू करणार आहे, अशी माहिती आयुक्त सतिष कुलकर्णी यांनी आज दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
जळगाव शहरात कोरोना दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासनाने शहरात तीन दिवसाचा जनता कॅर्फ्यू लावला होता. तरी देखील कोरोना रुग्ण संख्या अधिकच वाढत आहे. यात प्रामुख्यांने पिंप्राळा, खोटेनगर, कांचनगर, गणेश काॅलनी, शिव काॅलनी आदी परिसरातून रुग्ण मोठे आहे. त्यामुळे या मोहिमेची सुरवात या परिसरातील सुरू केली जाणार आहे. तसेच महापालिकेचे १० हेल्थ सेंटर कार्यान्वीत असून त्यांच्या माध्यमातून शहरात ही मोहिम राबविली जाणार आहे.
दरम्यान, शहरात अनेक नागरीक मास्क न वापरणे, सोशल, फिजीकल डिस्टस्निंगचा नियम पाळत नसल्याचे दिसत आहे. याबाबत महापालिकेने चार तयार केल्या असून टिम पोलिसांच्या मदतीने ॉ या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करत आहे. तसेच मुख्यबाजारपेठ परिसर असलेल्या सुभाष चौक परिसरावर स्पेशल टिम तयार करून येथे कारवाई केली जाणार आहे. जळगाव शहरात कोरोना रुग्ण शोध मोहिम लवकरच सुरू होणार आहे. त्यासाठी नागरिकांचे सहकार्य मिळणे आवश्यक असून ज्यांना लक्षणे वाटतात त्यांनी लगेच कोरोनाची चाचणी करूण घेणे आवश्यक आहे. शोध मोहिमेला आलेल्या पथकाला माहिती न लपवता योग्य माहिती देवून सहाकार्य करावे असे आव्हान यावेळी आयुक्तांनी केले.