मनपा विशेष : आस लावून बसू नका ; शहरातले रस्ते पावसाळ्याआधी होणारच नाहीत !
जळगाव लाईव्ह न्यूज । मनपा विशेष । शहरातील रस्ते न होण्याची अनेक कारणं समोर येत असताना नागरिकांना मात्र जळगाव शहरातले रस्ते होतील अशी आशा आहे. मात्र जळगाव शहरातील नागरिकांनी अशा आशेत राहू नये. कारण 42 कोटी रुपयातून होणाऱ्या रस्त्यांसाठी लागणाऱ्या परवानग्या मनपाच्या अनियमित कारभारामुळे मिळत नसल्याने रस्ते काही पावसाळ्याआधी नाहीयेत.
42 कोटी रुपयांच्या निधीतून होणाऱ्या रस्त्यांना कित्येक अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे. त्या रस्त्यांचे ठिकाणी अमृत योजनेचे नळ कनेक्शन देण्याचे काम अजूनही शिल्लक आहे. अनेक ठिकाणी मनपा प्रशासनातर्फे बांधकाम विभागाला क्लिअरन्स देण्यात न आल्याने रस्त्यांची काम अजूनही सुरू झालेली नाहीत. तर काही ठिकाणी सुरु झालेले काम बंद करावी लागली आहेत.
अमृत योजनेअंतर्गत राहून गेलेले कामे पूर्ण करण्याबाबत मनपाच्या पदाधिकाऱ्यांकडून अनेक बैठका घेण्यात आल्या. तसेच या बैठकांमध्ये मनपा पाणीपुरवठा विभागाला वेळोवेळी सूचना देऊनही पाणीपुरवठा विभागाकडून ही रखडलेली कामे पूर्ण करण्यात आली नाहीत. यामुळे रस्त्यांची कामे होणार नाहीत.
तर दुसरीकडे नवीन रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली तर काही दिवसातच झालेले काम पुन्हा नळ कनेक्शन साठी फोडावे लागतील यासाठी रस्ते करायचीच नाहीत असा निर्णय घेण्यात आला आहे. यातून मनपाचा ढिसाळ कारभार समोर येतोच. मात्र या कारभारामुळे नागरिकांची होणारी हेळसान देखील समोर येते.
महापालिका प्रशासनातील अनेक त्रुटी आता समोर येऊ लागल्या आहेत. महापालिकेतील रिक्त असलेल्या जागा मनपा कर्मचाऱ्यांवर असणारा अतिरिक्त कामांचा बोजा. अशा कारणांमुळे महापालिकेच्या अनेक कामांवर परिणाम होत असून त्यापैकी रखडलेले नळकनेक्शन हे एक काम आहे.
महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग केवळ चार अभियंते आहेत. अशा परिस्थितीत पाच लाख जळगावकरांच्या पाणी पुरवठा घेणे शक्य नाही. यामुळे देखील आता पाणी पुरवठा विभागाकडून काम केली जात नाहीयेत.