आनंदवार्ता! जळगावमार्गे धावणारी ‘ही’ विशेष गाडी आता कायमस्वरूपी; पहा वेळापत्रक आणि थांबे

एप्रिल 23, 2026 8:52 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । मुंबई आणि मध्य प्रदेशकडे प्रवास करणाऱ्या जळगाव-भुसावळकर प्रवाशांना मोठा दिलासा देणारी बातमी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विशेष गाडी म्हणून धावणारी मुंबई-रिवा साप्ताहिक गाडी आता कायमस्वरूपी नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या गाडीला आता ‘सुपरफास्ट’चा दर्जा देण्यात आला असून ती नवीन क्रमांकासह रुळावर धावणार आहे.

train

रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, मुंबई-रिवा- ०२१८७ /०२१८८ ही विशेष गाडी आता नियमित केली आहे. त्यानुसार २०१५३ सीएसएमटी -रेवा साप्ताहिक सुपरफास्ट २४ एप्रिल, तर २०१५४ रेवा – सीएसएमटी साप्ताहिक २३ एप्रिलपासून धावेल.

गाडी क्र.२०१५३ ही प्रत्येक शुक्रवारी दुपारी १.३० वाजता मुंबई (सीएसएमटी) येथून सुटेल, तर त्याच दिवशी रात्री ७.३८ मिनिटाने जळगावला तर ८ वाजून १५ मिनिटाने भुसावळ रेल्वे स्थानकांवर ही गाडी पोहोचेल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ९.४५ वाजता रेवा येथे पोहोचेल.

तर २०१५४ क्रमांकाची गाडी गुरुवारी दुपारी ३.५० वाजता रेवा येथून सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ४.०५ ला भुसावळ तर ४.३५ ला जळगाव रेल्वे स्थानकावर ही गाडी पोहोचेल यांनतर दुपारी १२.२० वा. मुंबईत पोहोचेल.

या स्थानकांवर असेल थांबा?
दादर, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, हरदा, इटारसी, पिपरिया, गाडरवारा, नरसिंहपूर, जबलपूर, कटनी, मैहर आणि सतना थांबे आहेत.

या सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी एकूण २२ डबे असतील. यात १ एसी प्रथम श्रेणी, १ एसी द्वितीय श्रेणी, ४ एसी तृतीय श्रेणी, १२ स्लीपर (शयनयान) आणि ४ जनरल डब्यांचा समावेश असेल.या निर्णयामुळे जळगाव आणि भुसावळच्या प्रवाशांना आता मुंबई किंवा उत्तर भारतात जाण्यासाठी एका हक्काच्या आणि जलद रेल्वे पर्यायाची कायमस्वरूपी सोय झाली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now