जळगाव लाईव्ह न्यूज । सध्या रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची वाढती गर्दी आणि अतिरिक्त मागणी लक्ष्यात घेता रेल्वे प्रशासनाकडून अनेक विशेष गाड्या चालविल्या जात आहे. आता याच पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने भुसावळ आणि जळगावमार्गे मुंबई–नागपूर दरम्यान विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)–नागपूर दरम्यान दोन विशेष गाड्या धावणार असून गाडी क्रमांक ०२१३९ शनिवारी २५ जानेवारी रोजी मध्यरात्री ००.२० वाजता मुंबईहून सुटेल. तर त्याच दिवशी जळगाव स्थानकांवर सकाळी ७.२८ वाजता तर भुसावळला सकाळी ८ वाजून ५ मिनिटाने पोहोचेल. यांनतर दुपारी ०३.३० वाजता नागपूरला पोहोचेल.

परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक ०२१४० नागपूरहून त्याच दिवशी रात्री १०.०० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी ०१.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचेल.

या स्थानकांवर असेल थांबा?
या गाड्या दोन्ही बाजुने दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या प्रमुख स्थानकांवर थांबणार आहेत.
एक वातानुकुलीत द्वितीय, सहा वातानुकुलीत तृतीय, नऊ शयनयान, चार सामान्य द्वितीय, एक सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर व्हॅन (एलएचबी कोचेस), अशी डब्यांची रचना असणार आहे.



