मुंबईचा चेहरामोहरा बदलणार! मुख्यमंत्री फडणवीसांकडून ‘इन्फ्रास्ट्रक्चर मास्टर प्लॅन’ची घोषणा

जानेवारी 11, 2026 6:03 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । मुंबईच्या शाश्वत विकासासाठी आणि वाढत्या लोकसंख्येचा विचार करून राज्य सरकारने शहराचा ‘कायापालट’ करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईसाठी एका सर्वसमावेशक ‘इन्फ्रास्ट्रक्चर मास्टर प्लॅन’ ची घोषणा केली आहे. या योजनेमुळे मुंबईतील वाहतूक कोंडी फुटण्यासोबतच पायाभूत सुविधांचा दर्जा जागतिक स्तरावर नेण्याचा सरकारचा मानस आहे. हा मास्टर प्लॅन म्हणजे भविष्यातील ‘ग्लोबल मुंबई’ची पायाभरणी असल्याचे बोलले जात आहे.

DF BMC

या आराखड्यांतर्गत मुंबईतील रस्ते, पूल आणि मेट्रो मार्गांचे जाळे अधिक भक्कम करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी नमूद केल्यानुसार, मुंबईला ‘सिमेंट काँक्रीट’चे शहर न बनवता, ‘स्मार्ट आणि ग्रीन सिटी’ बनवण्यावर भर दिला जाणार आहे.

Advertisements

मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घोषणेला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. मुंबईकरांचे जीवन सुसह्य करणे हेच आमचे प्रथम कर्तव्य आहे, असे म्हणत फडणवीसांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. गेली अनेक वर्षे रखडलेले प्रकल्प आता मार्गी लागतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Advertisements

या मास्टर प्लॅनमुळे केवळ वाहतूकच नाही, तर आरोग्य आणि शिक्षणाच्या क्षेत्रातही आमूलाग्र बदल घडवण्याचे संकेत दिले आहेत. मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना गती देऊन सर्वसामान्यांना हक्काचे घर मिळवून देणे, हा या योजनेचा एक मुख्य भाग आहे. आता या योजना प्रत्यक्षात कधी उतरतात, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

प्रमुख प्रकल्प आणि वैशिष्ट्ये:

मेट्रोचे जाळे: मुंबईतील मेट्रो प्रकल्पांना वेग देऊन उपनगरे आणि मुख्य शहर यांच्यातील प्रवास अधिक वेगवान करणे.

कोस्टल रोडचा विस्तार: पश्चिम किनारपट्टीवरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी कोस्टल रोडच्या पुढील टप्प्यांचे काम युद्धपातळीवर पूर्ण करणे.

रस्ते काँक्रीटीकरण: मुंबईतील खड्डेमुक्त प्रवासासाठी ५०० किमीहून अधिक रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याचे उद्दिष्ट.

पाणी उपसा यंत्रणा: पावसाळ्यात मुंबई तुंबू नये म्हणून नवीन पंपिंग स्टेशन उभारण्यावर भर.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now